rajkiyalive

KHANAPUR VIDHANSABHA : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गोपीशेठनी ‘लाडक्या भावाला’ उतरवले विधानसभेच्या मैदानात

प्रताप मेटकरी/ जनप्रवास विटा

KHANAPUR VIDHANSABHA : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गोपीशेठनी ‘लाडक्या भावाला’ उतरवले विधानसभेच्या मैदानात : माझी लाडकी बहिण योजनेच्या मोफत फॉर्म नोंदणी उपक्रमाच्या माध्यमातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभा तर माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी खानापूर मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीची साखरपेरणी सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले थोरले बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांचे जोरदार लौचिंग करून ‘लाडक्या भावाला’ खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभेच्या मैदानात उतरविण्यासाठी ताकदीने यंत्रणा सज्ज केली आहे.

KHANAPUR VIDHANSABHA : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गोपीशेठनी ‘लाडक्या भावाला’ उतरवले विधानसभेच्या मैदानात

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर खानापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. आमदार गोपीचंद पडळकर हे जतमधून चाचपणी करत आहेत मात्र तरी त्यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघावर विशेष नजर ठेवली आहे. मात्र ब्रह्मानंद पडळकर यांनी गेल्या दोन महिन्यापासून खानापूर, आटपाडी व विसापूर सर्कलमध्ये जनसंपर्क वाढवला असून आमदारकी लढवण्याच्या दृष्टीने सुरुवात केली आहे.

कोणत्याही परिस्थितीत यावेळेस खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यात उतरण्याचा निर्धार करून शड्डू ठोकला आहे. माझी लाडकी बहिण योजनेच्या मोफत फॉर्म नोंदणी उपक्रमाच्या माध्यमातून बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांचे जोरदार लौचिंग करून ‘लाडक्या भावाला’ खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभेच्या मैदानात उतरविण्यासाठी आमदार पडळकर यांनी ताकदीने यंत्रणा सज्ज केली आहे.

माझी लाडकी बहिण योजनेच्या मोफत फॉर्म नोंदणी उपक्रमाचे खानापूर विधानसभा मतदारसंघात परफेक्ट नियोजन केले असून या उपक्रमाच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातील घराघरांत पोहचण्याचा मानस पडळकर बंधूंचा आहे. माझी लाडकी बहिण ही राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना आहे. मात्र या योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरताना सर्व्हर डाऊन असल्याने फॉर्म सबमिट होत नाही.

काही ठिकाणी नेटवर्कची समस्या येत असल्याने फॉर्म सबमिट होत नाहीत,

अशा अनेक तक्रारी महिलांच्या येत आहेत. फॉर्म भरण्यासाठी महिलांची तारांबळ होत आहे. त्यामुळे खानापूर विधानसभा आणि जत मतदारसंघातील महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून माझी लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीसाठी संपूर्ण खानापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 25 विशेष गाडयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

10 गाड्या खानापूर तालुक्यात 10 गाड्या आटपाडी तालुक्यात तर 5 गाड्या विसापूर सर्कलमधील प्रत्येक गावात फिरविल्या जाणार आहेत.

जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील गावनिहाय चोख आणि योग्य नियोजन केले आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय केंद्रबिंदू असणाऱ्या विटा शहरात आज 10 विशेष गाड्यांच्या ताफ्यासह जोरदार शक्तिप्रदर्शन करत उपक्रमाचा धडाकेबाज शुभारंभ केला. पहिल्या टप्प्यात विटा शहर टार्गेट करून विटा शहरातील सर्व प्रभाग आणि विविध उपनगरात या विशेष 10 गाडया फिरून महिलांचे नोंदणी फॉर्म मोफत भरले जाणार आहेत.

त्यामुळे निमित्त जरी माझी लाडकी बहिण योजनेच्या मोफत फॉर्म नोंदणी उपक्रमाचे असले तरी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटाने गनिमी काव्याने राजकीय केंद्रबिंदू असणाऱ्या विटा शहरात दिमाखदार एंट्री करत आगामी विधानसभा निवडणुकीची साखरपेरणी सुरू करत विधानसभा निवडणूकीत रंगत आणली आहे. आज जरी या या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ झाला असला तरी मतदारसंघातील महिलांचा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज