प्रताप मेटकरी
khanapur vidhansabha news : बाबर गटाचा यशस्वी सूत्रधार अमोलदादा बाबर: खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या ऐतिहासिक निवडणूकीत आमदार सुहास बाबर झाले. जनतेने सुहास बाबर यांना आमदार म्हणून डोक्यावर घेतले. कार्यकर्त्यांनी सुहासभैय्यांना खांद्यावर बसवून नाचवले. परंतु या अलोट गर्दीत मात्र दस्तुरखुद आमदार सुहास बाबर यांनी आपल्या खांद्यावर एकाच व्यक्तीला खांद्यावर घेतले. त्या व्यक्तीचे नाव म्हणजे थोरले बंधू अमोलदादा बाबर. खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर बाबर गटाचा यशस्वी सूत्रधार कोण असेल ? तो म्हणजे अमोलदादा बाबर आहेत, या निवडणूकीच्या निकालाने स्पष्ट झाले.
khanapur vidhansabha news : बाबर गटाचा यशस्वी सूत्रधार अमोलदादा बाबर
विधानसभा निवडणूकीतील किंगमेकर म्हणून अमोलदादा बाबर यांना पाहिले जाते. निवडणूकीच्या धामधूमीत सुहास बाबर यांनी मी माझा भाऊ अमोलदादा यांना माझ्या वडिलांच्या ठिकाणी बघतो. गावाने पार्टीने सुहास बाबर यांना उमेदवार ठरविण्याआधी स्वत: अमोलदादा बाबर यांनी ही जबाबदारी सुहासभैय्यांच्या खांद्यावर सोपविली होती. मुळातच अमोलदादा बाबर यांचे बाबर कुटुंबियांच्या एकूण राजकीय वाटचालीत मोठे योगदान आहे. ते नेहमीच पडद्यामागून सूत्रे हलवत असतात.
अनिलभाऊंच्या दोन विधानसभा निवडणूकांमध्ये आणि विटा नगरपालिकेच्या दोन निवडणूकांमध्ये त्यांची भूमिका महत्वपुर्ण राहिलेली आहे. प्रत्यक्ष पद घेण्यापेक्षा पडद्यामागून सुत्रे हलविण्यात अमोलदादांना नेहमी स्वारस्य राहिले आहे. बाबर गटामध्ये सर्व कार्यकर्त्यांमध्ये अमोलदादा बाबर यांना कमालीचे महत्व आहे. पुर्वी राजकारणात आमदार अनिलभाऊ बाबर हे काही मोक्याच्या क्षणी अमोलदादांशी सलामसलत करायचे, अशी त्यांचे निकटवर्तीय सांगतात. तर आमदार सुहास बाबर देखील त्यांचा कोणताच शब्द मोडत नाहीत.
खानापूर मतदारसंघाच्या बाबर गटातील दादामाणूस म्हणून अमोल बाबर यांच्याकडे पाहिले जाते. केवळ राजकीय चढउतार नाही तर कुटुंबावर जी जी संकटे कोसळली. त्या – त्यावेळी अमोलदादा बाबर हे पहाडासारखे उभे राहिले. अनिलभाऊंच्या पश्चात झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणूकीत अमोलदादांनी रात्रीचा दिवस करून राजकीय जुळण्या लावल्या. सुहास बाबर यांना अमोल बाबर यांचे योगदान वेळोवेळी सभांमधून बोलून दाखवले.
विधानसभेचा निकाल जाहीर होताच सुहासभैय्यांनी अक्षरश: आपले थोरले बंधू अमोलदादांना खांद्यावर घेऊन नाचले.
कोणतेही यश वरकरणी दैदिप्यमान दिसत असले तरी त्यामागे असा एक सूत्रधार असतो की तो यशस्वी खेळ्या करत असतो. खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर बाबर गटाचा यशस्वी सूत्रधार कोण असेल ? तो म्हणजे अमोलदादा बाबर आहेत, या निवडणूकीच्या निकालाने स्पष्ट झाले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.