kolhapur murdar news : एकतर्फी प्रेमाच्या त्रिकोणात जिवलग मित्राचा खून : कोल्हापूर शहरामध्ये लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये घडलेल्या हत्येनंतर तरुणाने सुद्धा केलेल्या आत्महत्येनंतर कोल्हापूर हादरलं असतानाच आता आणखी एका घटनेनं कोल्हापूरचं समाजमन सुन्न झालं आहे.
kolhapur murdar news : एकतर्फी प्रेमाच्या त्रिकोणात जिवलग मित्राचा खून
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मित्रानेच मित्राला संपवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातील करवीर तालुक्यामध्ये घडला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मुलांमध्ये कधी एकतर्फी प्रेमातून, तर कधी अन्य कारणांमधून होणार्या हत्याकांडाने कोल्हापूर हादरून गेलं आहे. रिल्सचा सुद्धा होणारा वापर चितेंचा विषय झाला आहे.
जिवलग मित्रानेच संपवलं
केर्लेपैकी हनुमान नगरातील खाणीमध्ये मृत्यू झालेल्या महेंद्र प्रशांत कुंभार (वय 18) या युवकाचा मृत्यू नसून त्याचा जिवलग मित्राने खून केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. हा संपूर्ण प्रकार एकतर्फी प्रेमामध्ये अडचण ठरल्याने मित्रालाच मित्रानेच संपवल्याचे समोर आलं आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये संबंधित अल्पवयीन मित्राला पोलिसांनी ताब्यात घेत पंधरा दिवसांसाठी बाल सुधारगृहामध्ये पाठवलं आहे.
केर्ले गावामधील महेंद्र आणि अल्पवयीन आरोपी मित्र लहानपणापासून जिवलग मित्र होते.
इतकंच नव्हे तर एकाच बाकड्यावरती ते बसत होते. दोघांनी सुद्धा बारावी परीक्षा एकत्रित पास केली होती. इतकी या दोघांची घनिष्ठ मैत्री होती. मात्र, या मैत्रीमध्ये एका मुलीची एन्ट्री झाल्याने दोघांमध्ये वितूष्ठ निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार महेंद्रचे गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्याच मुलीवर अल्पवयीन आरोपी मुलगा सुद्धा एकतर्फी प्रेम करत होता. त्यामुळे महेंद्र आणि ती मुलगी एकमेकांशी बोलून भेटून त्यांचं फिरणं सुरू असल्याने एकतर्फी प्रेम करणार्या अल्पवयीन आरोपी मित्राला याचा राग येत होता.
महेंद्रचा मोबाईल सुद्धा फोडून टाकला आणि त्याच्या दुचाकीची चावीसुद्धा फेकून दिली
त्यामुळे एकतर्फी प्रेमात आपलाच जिवलग मित्र महेंद्र हा प्रेमामध्ये अडचण वाटू लागला होता. त्यामुळे या दोघांमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये वाद सुद्धा झाला होता. दरम्यान 3 जून रोजी महेंद्रला अल्पवयीन आरोपीने मोहित्यांच्या खाणीजवळ बोलवून घेतलं होतं. यावेळी दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली. यावेळी आरोपी अल्पवयीन मित्राने महेंद्रचा मोबाईल सुद्धा फोडून टाकला आणि त्याच्या दुचाकीची चावीसुद्धा फेकून दिली. यानंतर आणखी वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने जोरदार धक्का दिल्याने महेंद्र सव्वाशे फूट खोल खणीत कोसळला.
Murder of best friend in one-sided love triangle
यामुळे महेंद्रला गंभीर धोखापत झाली होती. फोन बंद असल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता खणीमध्ये तो पडून होता. त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मोबाईल लोकेशन शोधून काढले असता शेवटचे लोकेशन खणीजवळच सापडून आले. संशयिताची कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबूली दिली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.