kupwad murdar news : कुपवाड येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून : कुपवाड: शहरातील प्रकाशनगर येथे मामाने व त्याच्या मुलाने भाच्याचा दगडाने व लोखंडी पाईपने मारून निर्घुण खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली .राहुल अप्पासाहेब सूर्यवंशी (वय 38 रा. प्रकाशनगर)असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली असून याप्रकरणी दोन संशयितांना कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप रावसाहेब सावंत (वय 52)व सौरभ संदीप सावंत( वय 22रा.दोघे प्रकाशनगर,कुपवाड) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
kupwad murdar news : कुपवाड येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून
याबाबत अधिक माहिती अशी की,शहरातील प्रकाशनगर येथे मयत राहुल सूर्यवंशी व त्याचे मामा संदीप सावंत शेजारीच राहत होते. त्यांच्यात जमिनीचा वाद होता. अथवा त्याने नात्यातील मुलीची छेड काढली या कारणातून मंगळवारी दुपारी पुन्हा त्यांच्यात वाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
यावेळी वादावादी झाली. दोघा संशयितानी मिळून दगडाने व रॉड ने जबर मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला जबर मार लागल्याने राहुल रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला.या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिस ठाण्याचे सहा. पो.नि.दीपक भांडवलकर पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुलला आयुष हेल्पलाइनच्या रुग्णवाहिकेतून शासकिय रूग्णालयात दाखल केले.
kupwad-murdar-news-youth-stoned-to-death-in-kupwad
परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनि घोषित केले.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक संदीप घुगे , पोलिस उपअधीक्षक रितू खोकर,पोलीस उपविभागीय अधिकारी विमला एम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या.
या प्रकरणी दोन संशयितांना कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले असून खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.पोलिस रात्री उशीरापर्यंत संशयितांची कसून चौकशी करीत होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



