सांगली : लग्नाच्या आमिषाने तरूणीचे लैंगिक शोषण : कर्नाटकच्या तरुणावर गुन्हा दाखल. : शहरात राहणार्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित कुमार भिमराव कांबळे (वय 30, रा. बिस्नाळ, जि. विजयपूर, कर्नाटक) याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
लग्नाच्या आमिषाने तरूणीचे लैंगिक शोषण : कर्नाटकच्या तरुणावर गुन्हा दाखल.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरूणी ही मिरजेत राहते. संशयित कुमार आणि तिची मार्च 2020 मध्ये ओळख झाली होती. कुमार याने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. त्यामुळे तिचा त्याच्यावर विश्वास बसला. विश्रामबाग येथून धामणी रस्त्यावर कुमार याने भाड्याने घर घेतले होते. तिचे पिडितेशी इच्छेविरूद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. कुमारने तिचे अश्लिल फोटो घेतले होते. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. तसेच त्याने तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार कुमार याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
————————–
सांगलीत कौटुंबिक वादातून महिलेस बेदम मारहाण करत चाकूने हल्ला : चौघांविरोधात गुन्हा दाखल.
सांगली : शहरातील शामरावनगर येथील महादेव कॉलनी मध्ये कौटुंबिक वादातून चौघांनी मिळून एका महिलेस लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. सदरचा प्रकार हा शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जखमी वहिदा गुलाब सय्यद (वय 50 रा. शामरावनगर) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणार्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सैफन बशीर सय्यद, बेबी सैफन सय्यद, करिष्मा सैफन सय्यद आणि शोएब सैफनं सय्यद (सर्व रा. शामरावनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वहिदा सय्यद या आपल्या कुटुंबियांसह शहरातील शामरावनगर परिसरातील महादेव कॉलनी मध्ये राहतात. संशयित चौघेजण हे त्यांच्या शेजारीच राहतात. वहिदा सय्यद आणि संशयितांमध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाला होता. या वादाच्या रागातून संशयित चौघांनी संगनमत करून शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पुन्हा वहिदा यांच्याशी वाद घालून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात सुरवात केली. यावेळी संशयित शोएब सय्यद याने घरात असलेल्या पोते कंपन्यांच्या चाकूने हल्ला करत त्यांना जखमी केले. घडलेल्या या घटनेनंतर जखमी वहिदा सय्यद यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून संशयित चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.