rajkiyalive

विकासाची परंपरा ठेवण्यासाठी सुधीरदादांना साथ द्या आ. सिद्धार्थ गाडगीळ ः गावभागात प्रचारार्थ बैठक

विकासाची परंपरा ठेवण्यासाठी सुधीरदादांना साथ द्या आ. सिद्धार्थ गाडगीळ ः गावभागात प्रचारार्थ बैठक: मागील दहा वर्षात सांगली शहरासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात विकासाची एक परंपरा निर्माण झाली आहे. स्थायी स्वरूपाची ती विकास परंपरा कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा आमदार सुधीर गाडगीळ यांनाच मोठ्या मताधिक्याने महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा, असे आवाहन आमदार गाडगीळ यांचे चिरंजीव सिद्धार्थ गाडगीळ यांनी केले.

विकासाची परंपरा ठेवण्यासाठी सुधीरदादांना साथ द्या आ. सिद्धार्थ गाडगीळ ः गावभागात प्रचारार्थ बैठक

गावभागातील सांभारे रस्त्यावर आयोजित प्रचार बैठकीत गाडगीळ बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. संतोष चिवटे होते. यावेळी राष्ट्रीय महिला राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या भार्गवी सटाले हिचा सिद्धार्थ गाडगीळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सिद्धार्थ गाडगीळ म्हणाले, मतदारसंघात रस्ते, पूल, गटारी, मंदिरांचे सभामंडप, जीर्णोद्धार अशी असंख्य कामे गेल्या दहा वर्षात केली आहेत. याशिवाय शेकडो नागरिकांची व्यक्तिगत कामे केली आहेत. तसेच रुग्णांना मदत मिळवून दिली आहे. सांगलीत हनुमाननगरात सुसज्ज नाट्यगृह आता उभे राहणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी25 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या नाट्यगृहाची उभारणी याचबरोबर मतदार संघातील अन्य विकास कामे यांची गती कायम ठेवण्यासाठी सुधीरदादा गाडगीळ हेच पुन्हा एकदा विधानसभेत निवडून जाणे आवश्यक आहे. गावभागातून त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल याची आम्हाला खात्री आहे.

माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, गावभागाने नेहमीच दादांना मताधिक्य दिले आहे. त्यामुळे आम्हाला गावभागातल्या मताधिक्याची काळजी नाही. फक्त प्रत्येकाने आवर्जून मतदान करायचे आहे. हे लक्षात ठेवा. शंभर टक्के मतदान झाले पाहिजे, याकडे कटाक्ष राहू दे. प्रा. चिवटे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्य या खेपेस आम्ही दादांना देऊ.

महावीर कर्वे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला पुढील वर्षी शंभर वर्षे होत आहेत. गाडगीळ कुटुंबीयांनी संघाला नेहमीच मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवून या खेपेस आपल्याला सुधीरदादांना गावभागातूनच नव्हे; तर सर्व मतदारसंघातच जास्तीत जास्त मताधिक्य द्यायचे आहे. संघ परिवाराची ती जबाबदारी आहे.

यावेळी बाळासाहेब बेलवलकर, दीपक कर्वे, अवधूत सांभारे, चिंतामणी सांभारे, गजानन वैद्य, अरुण शियेकर, अजित पोतदार, बंटी भुरट, अनिल अपराध, अशोक माने आदि उपस्थित होते. माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी नियोजन केले.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज