maharashtra mansoon mews : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुण्याच्या घाट परिसरात पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’; पुण्याच्या घाट परिसरात पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’: राज्यात पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात ७ आणि ८ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या भागाला ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.
maharashtra mansoon mews : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुण्याच्या घाट परिसरात पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’
हवामानशास्त्रीय स्थिती:
दक्षिण गुजरातपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्रसपाटीवरील वार्याची द्रोणीय रेषा सक्रिय असल्यामुळे राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
कोकण आणि गोवा:
-
ठाणे, पालघर आणि रत्नागिरी येथे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-
या भागांत वार्याचा वेग ताशी 40 ते 45 किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र:
-
नाशिक, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
-
पुण्याच्या घाटमाथा परिसरात, विशेषतः मुळशी, भोर, वेल्हे, ताम्हिणी घाट, खंडाळा आदी ठिकाणी 20 सें.मी. पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे येथे ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भ:
-
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे येथे ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
-
भंडारा (दि. 7 जुलै) आणि गोंदिया (दि. 7 व 8 जुलै) येथे मेघगर्जनेसह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई व पुणे शहर:
-
मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
-
पुणे शहरात पुढील दोन दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सूचना:
-
नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
-
घाटमाथ्याच्या भागात पर्यटन टाळावे.
-
दरड कोसळणे, पाण्याची निचरा न होणे यांसारख्या संभाव्य घटनांसाठी दक्ष राहावे.
हवामानातील हे बदल लक्षात घेता, सुरक्षितता बाळगणे अत्यावश्यक आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.