rajkiyalive

महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत,

’माझा’च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!

महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, मुंबई: महाराष्ट्रात 2019 नंतर साली झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर प्रथमच होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता. एबीपी माझा आणि सी-व्होटरने केलेल्या मतदानपूर्व चाचणीचा निष्कर्ष समोर आला आहे. यामध्ये कागदावर बलाढ्य मानल्या जाणार्‍या आणि सध्या सत्तेत असलेल्या भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत,

काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीला लक्षणीय यश मिळताना दिसत आहे. एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 30 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील. तर 18 लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल. बारामती, माढा, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल पाहायला मिळू शकतात.

महायुती = 30
महाविकास आघाडी = 18
———–
एकूण = 48
कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप = 21/22
शिवसेना (एकनाथ शिंदे) = 9/10
राष्ट्रवादी (अजित पवार ) = 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) = 9
राष्ट्रवादी (शरद पवार) = 5
काँग्रेस = 3
———–
एकूण = 48

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर

राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिल्या जाणार्‍या बारामती लोकसभेची निवडणुकीत एबीपी माझा-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. याठिकाणी सुनेत्रा पवार पिछाडीवर दिसत आहेत. हे अजित पवार यांच्यासाठी धाकधूक वाढवणारी बाब आहे. बारामती लोकसभेसाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटाने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. अजित पवारांनी बारामतीच्या विकासासाठी मोदींच्या विचाराचा खासदार निवडून देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, बारामतीचे मतदार सुप्रिया सुळेंच्या बाजूने दिसत आहेत.

महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार राज्यात महायुतीला 30 जागांवर विजय मिळेल. यामध्ये भाजपला 21 ते 22, शिंदे गटाला 9 ते 10 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे. तर अजित पवार गटाला एकाही जागेवर विजय मिळणार नाही. अजित पवारांसाठी बारामतीची जागा सर्वात प्रतिष्ठेची आहे. मात्र, बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव होण्याचा अंदाज आहे.

महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 48 पैकी 18 लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये काँग्रेसला 3, शरद पवार गटाला 5 आणि उद्धव ठाकरे गटाला एकूण 9 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला गडचिरोली-चिमूर, नंदुरबार आणि नांदेडमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे. तर शरद पवार गटाला बारामती, सातारा आणि शिरुर या प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये विजय मिळेल, असा अंदाज आहे.

अजित पवारांना सर्वात मोठा धक्का, लोकसभा निवडणुकीत भोपळाही फोडता येणार नाही

शरद पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेणार्‍या अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला भोपळाही फोडता येणार नाही. बारामती, शिरुर, रायगड आणि धाराशिव या चारही मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाचा पराभव होण्याचा अंदाज आहे. बारातमतीमध्ये सुनेत्रा पवार आणि रायगडमध्ये सुनील तटकरेंचा पराभव अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असू शकतो.

मुंबईतील सर्व जागांवर एनडीए आघाडीच्या उमेदवारांचा विजय, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धव ठाकरे यांनी आग्रहाने मुंबईतील जवळपास सर्व मतदारसंघ मागून घेतले होते. केवळ दोन मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले होते. मात्र, एबीपी माझाच्या ओपिनियन पोलनुसार मुंबईतील सर्व जागांवर महायुती अर्थात एनडीएच्या उमेदवारांचा विजयी होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई आणि वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर यांचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे. केवळ ईशान्य मुंबईच्या जागेवर ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे भाजपच्या मिहीर कोटेचा यांना तगडी लढत देऊ शकतात. त्यामुळे ईशान्य मुंबईत ठाकरे गटाचा विजय होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरमध्ये काय होणार?
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज आणि शिंदे गटाकडून संजय मंडलिक रिंगणात आहेत. ही जागा प्रतिष्ठेची मानली जात आहे. मात्र, एबीपी माझाच्या ओपनियन पोलनुसार कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक हे सध्या आघाडीवर दिसत आहेत. याठिकाणी तगडी लढत होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये महायुतीचे संजय मंडलिक विजय होऊ शकतात, असा निष्कर्ष सर्व्हेतून समोर आला आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज