rajkiyalive

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार : शरद पवार

कवठेमहांकाळ (प्रतिनिधी):-

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार : शरद पवार :  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात सर्वसामान्य गोरगरीब जनतेसह शेतकरी वर्गाच्या विकासासाठी काहीच काम केले नाही.मोदी सरकार हे मुठभर लोकांच्यासाठी आहे.सर्वसामान्य जनतेसाठी नाही. यामुळे देशातील गोरगरीब जनता दुखावली आहे. देशातील जनतेने परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभे प्रमाणेच विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे. असा स्पष्ट विस्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान विधानसभा निवडणु कीत रोहीत पाटील यांना साथ देण्याचे आवाहन राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी केले.

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार : शरद पवार

तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवानेते रोहीत दादा पाटील यांच्या  ढदिवसानिमित्त कवठेमहांकाळ येथील महांकाली सहकारी साखर कारखा न्याच्या मैदानावर आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. प्रारंभी राष्ट्रीय नेते शरद पवार व युवानेते रोहित पाटील यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.या मेळाव्यास तासगांव व कवठेमहांकाळ तालुक्यातील हजारो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्ता ही सेवेचे साधन आहे.सत्तेचा वापर हा योग्य पध्दतीने व शांततेने केला पाहिजे.

सत्ता ही विनयाने राबवायची असते.सत्ता कधीच डोक्यात जावू द्यायची नसते.मोदी सरकारच्या डोक्यात सत्ता गेली आहे. डोक्यात गेलेली सत्ता खाली आणली पाहीजे. डोकीतील सत्ता खाली आणण्याचा निर्णय जनतेने लोकसभा निवडणुकीवेळी घेतला आहे.राज्यात महाविकास आघाडीला संधी दिली आहे. राज्यातही संधी द्यावी.असे आवाहन करून सत्तेचा लाभ हा सर्वांना झाला पाहिजे.त्यासाठी मी जाणीवपूर्वक लक्ष देणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

स्वातंत्र्य मिळवून देण्यात अग्रेसर असलेले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू,राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य देत असलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी व देशात माहिती तंत्रज्ञानाचा आग्रह करणारे पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय खालच्या पातळीवर जहरी टीका सतत करीत आहेत.तसेच देशाकरिता देशभर पदयात्रा करणारे राहूल गांधी यांच्यावर नरेंद्र मोदी हल्ला चढविण्याचे नरेंद मोदी करीत आहेत.देशातील घातक असलेली नरेंद्र मोदी प्रवृत्ती समूळ नष्ट करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले.

महांकाली ला मदत का नाही ?

राज्य सरकारने राज्यातील अडचणीत असलेल्या एकूण 13 सहकारी साखर कारखा न्याना आर्थिक मदत जाहीर केली आहे.या निर्णयाचे स्वागत करतो. राज्य सरकारने वारणा, धुळे,श्रीगोंदा ,किसनवीर आदीसह कारखान्याला आर्थिक मदत केली.परंतु कवठे महांकाळ सारख्या दुष्काळी भागातील महांकाली सहकारी साखर कारखान्याला आर्थिक मदत का केली नाही? असा खरबरीत सवाल शरद पवार यांनी विचारला.व चार महिन्या नंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे.त्यावेळी मी पुढाकार घेऊन महांकाली साखर आर्थिक मदत करणार.व महांकाली साखर कारखाना पुन्हा उभा करण्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी कृषी मंत्री असताना शेतकरी वर्गासाठी 70 हजार कोटी रूपयांची कर्जमाफी केली आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग वाचला आहे.शरद पवार हेच शेतकर्याचे नेते आहेत.आर.आर.आबांनी एम.आय.डी.सी.साठी प्रयत्न सुरू केले होते.त्यावेळी आबांना श्रेय जाईल या भिती पोटी काही समाज कंटकानी विरोध केला. सध्या आम्ही एम.आय.डी.सी. मंजूर करून आणली आहे. एम आय.डी.सी.साठी लागणार्या पाण्याचे आरक्षण मंजूर केले आहे.आता शरद पवार यांच्या सहकार्याने मोठ्या कंपन्या आणण्यात येणार असल्याची ग्वाही युवानेते रोहीत पाटील यांनी दिली.

स्व.आर.आर.पाटील यांच्या पाठीशी विजयराव सगरे खंबीरपणे उभा राहीले होते.

आर.आर.आबा पाटील यांनी कवठे तालुक्यातील विकास केला.आबा हे कवठेमहांकाळ तालुक्याचे दैवत होते. सध्या महांकालीसाखर कारखाना आर्थिक अडचणी आहे. शरद पवार यांनी महाकाली साखर कारखान्यात लक्ष देण्याची आग्रही मागणी महाकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता वहिनी सगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना केली.

यावेळी संजय दादा पाटील,सुरेखा कोळेकर,अमोल नाना शिंदे,साधनाताई कांबळे, भगवान चव्हाण,गणेश पाटील,विश्वास तात्या पाटील, विराज नाईक,ताजूद्दीन तांबोळी,चिमणभाऊ डांगे,आमदार अरूण लाड यांची भाषणे झाली.अमर शिंदे यांनी आभार मानले.

शक्तीपीठ महामार्गाला खुला विरोध

राज्यात पुणे बेंगलोर राज्य मार्ग आहे. सध्या ग्रीन फील्ड राज्य मार्ग होत आहे.या मार्गाला आमचा पाठींबा आहे .परंतु सरकारने शक्तीपीठ महामार्ग मंजूर केला आहे. या मार्गात आमच्या भागातील शेकडो एकर बागायत जमिनी जाणार आहेत.आमच्या भागातील द्राक्ष बागा व ऊस शेती उध्वस्त होणार आहे.शेतकरी अडचणीत सापडणार आहे.शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही.आमचा शक्तीपीठ महामार्गाला खुला विरोध असल्याचा गंभीर इशारा युवानेते रोहीत दादा पाटील यांनी दिला.

यावेळी आमदार सुमनताई पाटील,सुरेश भाऊ पाटील,राजाराम तात्या पाटील, जेष्ठ नेते शंकर दादा पाटील,बाळासाहेब पाटील, बाबासाहेब मुळीक,प्रशांत शेजाळ, दादासाहेब कोळेकर, महेश पवार,शंतनु भैया सगरे, महेश पाटील,बद्रूद्दीन शिरोळकर,शंकर कदम,राहूल जगताप,आश्विनी पाटील,नलिनी भोसले,अनिता खाडे; चंद्रशेखर सगरे आदी सह तासगांव व कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते व शेतकरी तसेच महिला व तरूण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज