rajkiyalive

माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर प्राणघातक हल्याचा प्रयत्न

जत :- प्रतिनिधी
माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर प्राणघातक हल्याचा प्रयत्न: माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यामध्ये माजी आमदार विलासराव जगताप हे बचावले असून, हल्लेखोंराच्या हातात जे घातक शस्त्रे होती. ते गाडीवरील आरशाला लागल्याने जगताप बचावले आहेत.

माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर प्राणघातक हल्याचा प्रयत्न

या घटनेमुळे तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उमराणी गावाकडे जगताप गेले होते. उपसरपंच शिंदे यांच्या गोडावूनमध्ये कार्यकर्त्याशी बैठक घेवून तेथुन सायं 05:30 च्या सुमारास जिरग्याळ गावात सचिन संकपाळ यांच्या मळ्यात बैठक घेतली.त्या बैठकीत डफळापूर गावातील आमचे कार्यकर्ते सुनील तुकाराम छत्रे हे सुध्दा हजर होते.

येथील बैठक संपवुन सायंकाळी 6.30 वा.च्या सुमारास मिरवाड ते डफळापूर दरम्यान हांडे मळा, मिरवाड येथुन जात असताना 5 इसम दोन दुचाकीवरुन त्यातील एक दुचाकी स्प्लेंडर क्रं एम. एच 10 सी.डी. 2203 यावरुन येवुन इनोव्हा कार गाडी क्रमांक- एम.एच 10 डी.एल 9444 यावर उजव्या बाजुस त्यांच्या हातातील रॉडने काचेवर मारु लागले. त्यावेळी गाडीचे उजव्या आरशावर रॉड लागल्याने आरसा पूर्ण फुटला.

चालक सागर याने तात्काळ कार रस्त्याचे बाजुला घेतली असता ते तेथुन पळून गेले.

त्यावेळी इनोव्हा कारमध्ये जगताप यांचे नातू संग्राम जगताप, सुनील तुकाराम छत्रे हे होते. या घटनेची फिर्याद माजी आमदार विलासराव जगताप यानी पोलीस ठाणे जत येथे नोंद केली असून, सुनील तुकाराम छत्रे यानी फिर्यादीत असे म्हटले आहे की आमचे गाडीवर तसेच आमच्यावर हल्ला करण्यासाठी आलेले इसम बाळू हराळे, सायंता पाटील, राहुल संकपाळ, अणु ढोले व मेजर संकपाळ सर्व रा जिरग्याळ ता.जत जि सांगली असे हल्लेखोराचीं नावे असल्याचे सांगितले.

या हल्यामध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीचे तीस हजाराचे नुकसान झाल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. यावर माजी आमदार जगताप म्हणले आम्ही अपक्ष उमेदवार असलेल्या विशाल पाटील यांचा प्रचार करत असून. खासदार संजयकाका पाटील यांच्या पायाखालची वाळू घसरु लागली आहे.

खासदार संजयकाका पाटील यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागला आहे.

मी प्रचारात जाऊ नये यासाठी हा षडयंत्र असून, माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. या दबावाला मी भिक घालणार नाही. खासदार संजयकाका पाटील यांनी पोसलेले गुंड बिथरलेत, असा आरोप जगताप यांनी केला. यावेळी भाजप शहर अध्यक्ष अण्णा भिसे, संतोष मोटे, बाळ सावंत, प्रकाश मोटे, अवधुत वास्टर आदी उपस्थित होते.

जमा केलेले शस्त्र मिळावे

लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता सुरू असून, आचारसंहिता लक्षात घेता माझ्याकडील असलेले शस्त्र जत पोलीस ठाण्याकडे जमा केले आहे. माझ्या जीविताला धोका आहे जर पोलीस ठाण्याकडे जमा केलेले शस्त्र मला मिळावे. अन्यथा मला जत पोलीस स्टेशनकडून संरक्षण मिळावे अशी मागणी माजी विलासराव जगताप यांनी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज