सांगली :
maratha kranti morcha : जरांगे-पाटलांच्या रॅलीत चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला : गर्दीचा फायदा घेत 50 हजारांचे दागिने केले लंपास. : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची गुरुवारी सांगलीत रॅली निघाली होती. या रॅलीमध्ये गर्दीचा फायदा उचलत महिलांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. शहरातील राममंदिर ते पुष्पराज चौक परिसरात असलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने दोघांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाच्या 50 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन लंपास करुन पोबारा केला. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गोरख भिमराव पवार (रा. लक्ष्मी नगर, कुपवाड रस्ता, लक्ष्मी मंदिरनजीक, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
maratha kranti morcha : जरांगे-पाटलांच्या रॅलीत चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला : गर्दीचा फायदा घेत 50 हजारांचे दागिने केले लंपास.
याबाबत अधिक माहिती अशी कि, राम मंदिर चौकात मराठा आरक्षण जनजागृतीसाठी मराठा योद्धे जरांगे-पाटील यांची जाहीर सभा गुरुवारी पार पडली. तत्पूर्वी विश्रामबाग ते राम मंदिर चौक अशी शांतता रॅली काढण्यात आली.
या शांतता रॅली आणि सभेला जिल्ह्यातील मराठा समाजाचे हजारो बांधव सहभागी झाले होते. फिर्यादी गोरख पवार हे सोनार म्हणून कार्यरत आहेत. गुरुवार दि. 8 रोजी राममंदिर चौकात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन केले होते.
त्यामुळे पुष्पराज चौक ते राममंदिर चौक या परिसरात गर्दी होती. यावेळी फिर्यादी गोरख पवार हे याठिकाणी गेले असताना त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किंमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि रोहन मुळीक यांच्याकडील 20 हजार रुपये किंमतीची 10 ग्रॅम वजनाची चेन चोरट्याने शिताफीने लंपास केली.
काही वेळानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर आज पवार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.