rajkiyalive

मराठा वादळ सांगलीत धडकणार

मोर्चा-2 मध्ये लाखो बांधव सहभागी होणार, क्रांती मोर्चाकडून तयारी पूर्ण

जनप्रवास, सांगली 

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, तसेच जालना येथे आंदोलकांवर झालेला अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी (दि. 17) येथे मराठा समाजाचा मोर्चा-2 सांगलीत काढण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे दोन लाख मराठा बांधवांचे वादळ आज धडकणार असल्याचे स्पष्ट झाले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरासह जिल्ह्यातील गावागावात तयारी पूर्ण झाल्याचे चित्र होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्ग, पार्कींग व्यवस्थाही निश्चित झाली आहे. मोर्चासाठी आचारसंहिता बनविण्यात आली. मोर्चात सहभागी होताना बांधवांनी शिस्त बिघ डवू नका, असे आवाहन मराठा क्रांती मोच्यावतीने करण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी वर्षानुवर्षे लढाई सुरु आहे. गेल्या सात वर्षापूर्वी आरक्षणासाठी विराट मूक मोर्चा काढण्यात आला होता. सरकारकडून केवळ आश्वासन दिले जाते, मात्र प्रत्यक्ष आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. दिवसेंदिवस सरकारविरोधात नाराजी वाढली असताना दहा दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या बांधवावर अमानुष लाठीहल्ला करण्यात आला. त्यानंतर राज्यभर मराठा समाज रस्त्यावर आला. बंद आणि

मोर्चे काढत राज्य सरकारचा निषेध नोंदविला. राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र होत असताना रविवारी सांगली जिल्ह्यात क्रां

ती मोर्चा 2 काढण्यात येणार आहे.

जिल्हा बंदनंतर मोर्चा 2 ची तयारी पूर्ण झाली आहे. सांगलीतील राम मंदीर चौकात मोर्चाच्या व्यासपीठ उभारणी सायंकाळी पूर्ण झाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जनजागृती करण्यात आली असून मोर्चासाठी सर्वच स्तरातून पाठींबा मिळत आहे. मोर्चामध्ये दोन मराठा बांधव सहभागी होतील, असा विश्वास संयोजकांच्यावतीने व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाने आरक्षण मागितले आहे. गायकवाड समितीने केलेल्या शिफारसीनुसार आरक्षण देण्यात यावे. सरकारने योग्य ती पाऊले उचलून दिल्लीपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पोहोचवाव्यात, अशी मागणी केली जाणार आहे.

हेही वाचा

मराठा मोर्चात 2 लाख बांधव सहभागी होणार

मोर्चासाठी नियमावली

मोर्चासाठी आचारसंहिता तयार करण्यात आली असून प्रत्येकाने त्याचे पालन केले पाहिजे. मोर्चात मराठा तरुण-तरुणींच्या प्रलंबित नियुक्त्या मिळाल्याच पाहिजेत, या घोषणा व्यतिरीक्त कोणतीही घोषणा नको, मोर्चात स्वयंशिस्त पाळून मराठा समाजाचा सुसंस्कृतपणा दाखवा. स्वयंसेवक व पोलिस प्रशासनाला सहकार्य करा, समाजाचा मोर्चा कोणत्याही जाती धर्माविरोधात नाही, जातीधर्मा विरोधात घोषणाही नकोत, मोर्चात सहभागी होताना शिस्त बिघडवू नका. मोर्चात फक्त आणि फक्त मराठा म्हणून सहभागी व्हायचे आहे. मोर्चाला येताना गाडीवर हुल्लडबाजी करु नका, नेमलेल्या ठिकाणीच वाहने थांबवा, मोर्चात येताना पाणी बाटली, अल्पोपहार, स्वतःला लागणारी औषधे, गोळ्या बरोबर आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले.

सामाजिक संघटनांचा पाठींबा

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी सांगलीत काढण्यात येणार्‍या मोर्चाला काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, उद्धव ठाकरे शिवसेनेसह लिंगायत समाज, मुस्लिम समाज, जिल्हा केमिस्ट असोसिएशन, मराठा केमिस्ट संघटना यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी पाठींबा दिला. मुस्लिम समाजाच्यावतीने पाणी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे, तर लिंगायत समाजाकडून अल्पोपहाराचे वाटप केले जाईल. केमिस्ट असोसिएशनकडून मोर्चानंतर स्वच्छता केली जाणार आहे.

मोर्चाच्या मार्गावरील व्यवस्था

विश्रामबाग चौकातून राम मंदिर चौकापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मार्गावर विश्रामबाग, गेस्ट हाऊस, मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राम मंदिर चौक, सिव्हिल चौक येथे अ‍ॅम्ब्युलन्स असणार आहेत. त्याशिवाय ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. मोर्चाच्या मार्गावर दोन्ही बाजूने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही करण्यात आली आहे.

पार्किंग व्यवस्था

चारचाकी गाड्यांसाठी
सांगलीवाडी चिंचबाग, जनावरे वैरण बाजार, मल्टीप्लेक्स थिएटरजवळ, तात्यासाहेब मळा, मार्केट यार्ड, आयटी पार्क, चिंतामणराव महाविद्यालय, वालचंद कॉलेज, राजमती मैदान

दुचाकी वाहनांसाठीडॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, मार्केट यार्ड, कांतीलाल शाळा, राजमती शाळा याठिकाणी व्यवस्था करण्यात आली.

असा निघणार मोर्चा

रविवारी सकाळी साडेदहा वाजता क्रांतिसिह नाना पाटील यांना अभिवादन आणि जिजामातांना वंदन करुन मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चामध्ये पुढे मुली, मुले, महिला आणि त्यानंतर उर्वरित लोक असतील. साडेअकरा वाजता राम मंदिर चौकात मोर्चा पोहोचेल. तेथे मराठा क्रांतीची मशाल पेटवली जाईल. आरक्षण संदर्भातील पाच मुलांची भाषणे होतील. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येणार्‍या निवेदनाचे वाचन होईल. व्यासपीठावर अवघे पाच मुले आणि सूत्र संचलन करणार्‍या स्वाती शिंदे-पवार असतील.

मराठा मोर्चाच्या जनजागृतीसाठी महिलांची रॅली

जिल्ह्यातील गावागावातही मोटारसायकल रॅली काढत प्रबोधन

मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि जालना येथे आंदोलनकर्त्यावर झालेला अमानुस लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी (दि. 17) येथे मराठा समाजाचा मोर्चा-2 काढण्यात येणार आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी शनिवारी जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात रॅली काढण्यात आली. सांगली शहरात महिलांची मोटारसायकल रॅली काढली. त्यामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झालेल्या होत्या. उद्या हो

णार्‍या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

क्रांती मोर्चातर्फे सांगलीत रविवारी महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची येथे जय्यत तयारी झाली आहे. शहरासह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने लोकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातून जास्तीत-जास्त लोक येण्यासाठी महिलांची मोटार सायकल रॅली शहरातून काढण्यात आली. सकाळी दहाच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महिला एकत्र आल्या. त्यानंतर ही रॅली विजयनगर चौकातून हसनी आश्रम, स्फुर्ती चौक, शंभरफुटी रस्ता, चांदणी चौक, सिव्हिल चौक, रिसाला रस्ता या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आली. त्याठिकाणी रॅलीची सांगता झाली. भगव्या टोप्या, भगवे झेंडे घेऊन एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत ही रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये आशा पाटील, रेखा पाटील, प्रणिती पवार, ललिता घाडगे, कविता बोंद्रे ,आरती कार्वेकर, मानसी भोसले ,स्वाती गिड्डे, जयश्री घोरपडे, वैष्णवी पाटील आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज