rajkiyalive

मी कोणाला पाडण्यासाठी नव्हे, जिंकण्यासाठी मैदानात : डि. सी. पाटील

मी कोणाला पाडण्यासाठी नव्हे, जिंकण्यासाठी मैदानात : डि. सी. पाटील : मी कोणाला पाडण्यासाठी किंवा कुणाला जिंकवण्यासाठी मैदानात नसून, स्वत: जिंकण्यासाठी मैदानात उतरलो आहे, असे प्रतिपादन हातकणंगले लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डि. सी. पाटील यांनी केले.

मी कोणाला पाडण्यासाठी नव्हे, जिंकण्यासाठी मैदानात : डि. सी. पाटील

मिरज तालुक्यातील समडोळी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून काम करीत असताना संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याशी चांगला संपर्क आला. जिल्ह्यात त्यावेळी 500 कोटींची विकासकामे केली. परंतु राजकारणात चांगल्या माणसाला फार वेळ टिकू दिले जात नाही. मलाही कायम डावलण्यात येत होते. परंतु अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मला चांगली संधी दिली. वंचित बहुजन आघाडी हा कोणत्याही एका समाजाचा नाही. सर्वच स्थरातील गोरगरीब, वंचित बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी हा पक्ष काढला होता. गेल्या वेळी पक्ष स्थापन होवून केवळ 11 महिनेच झाले होते. तरीही आमच्या उमदेवारांने 1 लाख 25 हजार मतदान घेतले. आता पक्ष स्थापन होवून सहा वर्षे झाली आहेत.

अनेक स्तरातून आणि अनेक ठिकाणाहून मला पाठिंबा वाढत चालला आहे

त्यामुळे पक्षाचा जनाधार वाढला आहे. अनेक स्तरातून आणि अनेक ठिकाणाहून मला पाठिंबा वाढत चालला आहे. विरोधकांना वाटत आहे की, मी काही मते खावून कोणाला तरी पाडण्यासाठी आणि कुणाच्यातरी फायद्यासाठी निवडणूक लढवीत आहे. परंतु त्यांच्या पायाखालची वाळू आता घसरू लागली आहे.

गेल्या पाच वर्षात पडलेला उमेदवार आणि निवडून आलेला उमेदवार दोघेही मतदार संघात फिरकले नाहीत.

त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी पसरली आहे. लोकांना नवीन चेहरा आणि कामाचा माणूस हवा आहे. त्यामुळे मला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे माझा विजय नक्की आहे, असेही शेवटी ते म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्र भर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन, पदयात्रा, सभा, सगळीकडे चालू आहेत, त्याचाच एक भाग म्हणून हातकणंगले लोकसभा मतदार संघात ही आपल्या अधिकृत उमेदवार मा डी. सी. पाटील साहेब यांचा जोर देखील हळूहळू वाढू लागला आहे, आणि ह्याचे विजयात रूपांतर करण्यासाठी स्वतः या आठवड्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी सभा घेण्या साठी स्वतः आपले राष्ट्रीय अध्यक्ष, तुमचे आमचे श्रद्धास्थान आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे उद्या दिनांक 5 मे रोजी जयसिंगपूर याठिकाणी ठीक सकाळी 10 वाजता येत आहेत, आपण सर्व जिल्हा, तालुका, पदाधिकारी कार्यकर्ते आपली ही जबाबदारी पार पाडूया आणि बाळासाहेबांचे हात बळकट करूया.मोठ्या संख्येने उपस्थित राहूया.*

आशिष कांबळे (तालुका युवा अध्यक्ष
प्रथमेश शिर्क (तालुका महासचिव)
राहुल कांबळे(तालुका उपाध्यक्ष)
राधा बाघडी(तालुका उपाध्यक्ष)
गगन कांबळे(तालुका संघटक)
मुनवर मोमीन (तालुका संघटक)
रवी कांबळे (जिल्हा उपाध्यक्ष)
वंचित बहुजन युवा आघाडी

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज