मिरज प्रतिनिधी
MIRAJ : कळंबी पेट्रोलपंपावरील दरोडा प्रकरणातील तिघांना अटक : मिरज तालुक्यातील कळंबी येथील पेट्रोल पंपावर चारचाकीमध्ये विश्रांतीसाठी क्लूझर या चारचाकी वाहनामध्ये झोपलेल्या भाविकांवर अज्ञात सात ते आठजणांनी चाकुचा धाक दाखवून हल्ला करूनत्यांच्याकडील असलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 1 लाख 69 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. मिरज ग्रामीण पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या हल्ला प्रकरणातील तरबेज उर्फ तबर्या चारशिट्ट्या शिंदे, रणजीत अशोक भोसले, ( रा. वड्डी), सुरेश रवि भोसले (टाकळी बोलवाड) या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली आहे. या सर्वांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
MIRAJ : कळंबी पेट्रोलपंपावरील दरोडा प्रकरणातील तिघांना अटक
नांदेड येथून बालाजी पाटील त्यांची पत्नी व पाहुणे असे सर्वजण क्लूझर या चारचाही वाहनातून हैद्राबाद येथून तुळजापूर, पंढरपूर हून ते कोल्हापूर महालक्ष्मीला जाणार होते. रात्रभर प्रवास झाल्याने विश्रांती घेवून सकाळी कोल्हापूर येथील महालक्ष्मी दर्शनासाठी जाणार होते. विश्रांतीसाठी म्हणून ते कळंबी येथील एका पेट्रोलपंपावर चारचाकी गाडीतच झोपले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात साते आठ जण चारचाकी गाडीवर हल्ला चढविला होता. दरोडा टाकून चारचाकी गाडीतील चालक चंद्रकांत बावीकाडी व पत्नी तसेच बालाजी पाटील पत्नी यांच्याकडून चाकूचा धाक दाखवून 1 लाख 69 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
तिघांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत असताना पोलिसांना माहिती मिळाली की सिध्देवाडी खण येथे रेकार्डवरील गुन्हेगार तरबेज उर्फ तबर्या चारशिट्ट्या शिंदे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तबरजे याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्याला विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने आपण कळंबीतील प्रवाशांच्या गाडीवर दरोडा टाकल्याचे सांगितले. तसेच माझ्या सोबत रणजित अशोक भोसल े, सुरेश रवि भोसले असल्याचे सांगितले. पोलिसांनी तबर्याला बरोबर घेवून इतरांचा ठाव ठिकाणा उडकून आणखी दोघांना ताब्यात घेतले.या तिघांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. आणखी काही दरोड्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक पंकज पवार, पोलिस उपनिरीक्षक कुमार पाटील,पोहेकॉ संजय कांबळे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, दरिबा बंडगर, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, सागर लवटे, अमर नरळे, संदीप नलावडे, उदयसिंह माळी, तसेच मिरज ग्रामीणचे पोलिस निरीक्षक भैरू तळेकर, सहा.पो.निरीक्षक रणजित तिप्पे, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र भापकर, पोहेकॉ हेमंत ओबासे, शशिकांत जाधव,विकास भोसले, पोकॉ प्रदीप कुंभार, सचिन मोरे, वसंत कांबळे, सुनिल देशमुख, सुहास कुंभार, अफसाना मुलाणी, शबाना निकम, मिरज शहरचे सहा. पोलिस निरीक्षक विक्रम पाटील, , पोहेकॉ.वैभव पाटील, दीपक परीट, दत्तात्रय फडतरे पोलिस उप निरीक्षक संदीप गुरव, पोकॉ. बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, हणुमंत कोळेकर आदिंनी सहभाग घेतला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.