rajkiyalive

miraj vidhansabha 2024 : मिरजेतील नगरसेवकांचा सुरेश खाडेंना पाठिंबा

सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येवून केली घोषणा : पालकमंत्र्यांचा मास्टरट्रोक

मिरज :
miraj vidhansabha 2024 : मिरजेतील नगरसेवकांचा सुरेश खाडेंना पाठिंबा : मिरज विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मिरजेतील नगरसेवकांनी माझ्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला असून, मिरजेच्या विकासासाठी मिरजेतील नगरसेवक माझ्यासोबत असल्याचे राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. पत्रकार बैठकीत सर्वच नगरसेवक उपस्थित राहून एक प्रकारे ना.डॉ.सुरेशभाऊंनी विरोधकांना मास्टर ट्रोक लगावला आहे.

miraj vidhansabha 2024 : मिरजेतील नगरसेवकांचा सुरेश खाडेंना पाठिंबा

पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांंच्या पत्रकार बैठकीत सुरेशभाऊ आवटी, इद्रीसभाई नायवडी, अतहर नायकवडी, आनंदा देवमाने, काँग्रेसचे चंद्रकांत हुलवान, शिवाजी दुर्वे, काँग्रेसचे बबिता मेंढे, काँग्रेसचे संजय मेंढे, काँग्रेसचे करण जामदार, निरंजन आवटी, संदीप आवटी, राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात, भाजपचे गजेंद्र कुल्लोळी, भाजपचे पांडुरग कोरे, भाजपचे गणेश माळी, भाजपच्या संगीता खोत या सर्व नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीसाठी सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. .

ना.सुरेशभाऊ खाडे यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मास्टर ट्रोक

मारून विरोधकांना एक प्रकारे हतबल केल्याचे चित्र आहे. प्रत्येक नगरसेवकांना विकासासाठी निधी दिलेला आहे. अजूनही हा निधी देणार असून, त्यामुळे नगरसेवकांनी मिरजेच्या विकासासाठी ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे जोडे बाहेर ठेवून विकासासाठी एकत्र येण्याचा निर्णय सर्व नगरसेवकांनी घेतल्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच विरोधकांना थेट मास्टरस्ट्रोक लगावला.

Shantisagar Maharaj_01

सुरेशभाऊ आवटी म्हणाले, लोकसभेसाठी आम्ही भाजपच्या चार नगरसेवकांनी राजीनामा दिला होता. परंतु तो राजीनामा पक्षाने अजूनही स्वीकारलेला नाही. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये असून भाजपचे सदस्यही आहोत. मिरज विधानसभा निवडणुकीत ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांचे काम करणार असल्याचे सांगून सर्व नगरसेवक ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले. पंधरा वर्षे भाऊ आमदार आहेत. ना.डॉ.सुरेशभाऊ यांना मंत्रीपद नसतानाही प्रत्येक नगरसेकांना त्यांनी निधी दिला आहे. विधानसभेला प्रमाणिकपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

इद्रीसभाई नायकवडी म्हणाले, आम्ही सध्या भाजप सोबत सत्तेत असून, आम्ही ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मिरजेचा विकासासाठी भाऊंनी आत्तापर्यंत कोट्यवधींचा निधी दिला आहे.
आनंदा देवमाने म्हणाले, लोकसभेवेळीच आम्ही सांगितले होते की, भाऊ तुम्ही लोकसभेसाठी आम्हाला काही सांगून नका, विधानसभेवेळी आम्ही तुमच्यासोबत आहे. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही भाऊंसोबत आहोत. शहराचा विकास विकास होण्यासाठी भाऊंच्या सोबतच राहण्याचा आमचा निर्णय आहे.

संजय मेंढे यांनी प्रत्येक नगरसेवकांना ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी निधी दिला आहे. नगरसेवक कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार भाऊंनी कधीच केला नाही. त्यामुळे मिरजेच्या विकासासाठी भाऊंनी कायम निधी दिला आहे. त्यामुळे त्यांचा आम्ही आभार मानतो अशी सावध भूमिका संजय मेंढे यांनी घेतली.

मिरज पॅटर्नने नॉ.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

मिरजेतील बर्‍यापैकी सर्वच नगरसेवक यावेळी पालकमंत्र्यांच्या पत्रकार बैठकीत उपस्थित होते. भाऊंच्या विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.  .डॉ.सुरेशभाऊंनी आत्तापर्यंत कोट्यवधींचा निधी महापालिकेच्या विकासासाठी दिला आहे. काही दिवसात आणखी काही मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. भाऊंच्या समोर तगडा उमेदवार कोण अजून महाविकास आघाडीकडून स्पष्ट झालेला नाही. आता तर सर्वच नगरसेवक भाऊंना पाठिंबा दर्शवित आहेत मग विरोधकांची हवाच काढून घेण्याचे काम पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी केले आहे.

मिरजेच्या विकासासाठी भाऊंनी कोट्यवधींचा निधी दिला परंतु अजूनही मिरजेचा म्हणावा तसा विकास झालेली नाही असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावेळी हे सर्व चित्र बदललेले दिसेल असे पालकमंत्र्यांनी सांगितले. एकप्रकारे मिरज पॅटर्नला एकत्रीत करून ना.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी विरोधकांना मास्टर ट्रोक लगावल्यामुळे विरोधक चांगलेच घायाळ झाले आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज