rajkiyalive

मिरज विधानसभा क्षेत्रात 63 टक्के मतदान

मिरज /प्रतिनिधी
मिरज विधानसभा क्षेत्रात 63 टक्के मतदान : सांगली लोकसभा मतदार संघाची निवडणुक ही अत्यंत तिरंगी आणि चुरशीने झाली. महाविकास आघाडीचे पै.चंद्रहार पाटील, भाजपचे संजयकाका पाटील, अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत होती. मतदान प्रकिया पूर्ण झाली असून मिरज तालुक्यात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. 63 टक्के मतदान झाले आहे. मुख्य लढतीतील तिघांचेही भविष्य मशिनबंद झाले आहेत. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ता आमचाच गुलाल उधळणार अशी ग्वाही देत आहे. पालकमंत्री ना.डॉ.सुरेशभाऊ खाड यांनी आपला मतदानाचा हक्क सपत्नीक बजावला.

मिरज विधानसभा क्षेत्रात 63 टक्के मतदान

मिरजेत सकाळी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी दिसत होती. 10 वाजेपर्यंत गर्दी तशीच राहिली होती. दुपार नंतर प्रत्येक मतदान केंद्रावर उन्हामुळे तुरळक मतदार येत असल्याचे चित्र होते. शहरी भागात दुपारी 3 वाजल्यानंतर मतदार घराबाहेर पडू लागले. मिरज शहरात चुरशीने 60 टक्के मतदान झाले आहे. मिरज ग्रामीण भागातही मतदानाची टक्केवारी वाढली असून स्वयंस्फुर्तीने मतदार मतदानासाठी येत होते. काही ठिकाणी अतिशय संथगतीने मतदान प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे मोठ्या रांगा लागलेल्या दिसत होत्या.

मिरज शहरातील काही बुथवर मतदान प्रक्रिया संत गतीने सुरू असल्याने मतदारांतून संताप व्यक्त होत होता. मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्याने मतदारांमध्ये संताप व्यक्त होत होता. त्यानंतर निवडणुक अधिकारी त्या मतदान केंद्रावर आल्यानंतर तेथील कर्मचारी बदलण्यात आले. नंतर मतदान प्रक्रिया गतीने सुरू झाली.

मिरज तालुक्यातील 48 गावामध्ये मिरजसह 309 बुथ तयार करण्यात आले होते.

त्यासाठी 63 वाहने तैनात होती. या निवडणुक प्रक्रियेमध्ये एकूण 1854 कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होवून सायंकाळी उशीरापर्यंत ही मतदानाची प्रकिया सुरू होती. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

महाविकास आघाडीचे पै.चंद्रहार पाटील, भाजपचे संजयकाका पाटील, अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्यामध्ये तिरंगी झाली. प्रत्येकजण एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडत असल्याचे चित्र आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज