mirtaj crime news : मिरज शासकीय रूग्णालयातून तीन दिवसाच्या बाळाची चोरी: मिरज शासकीय रूग्णालयातील प्रसुती विभागातून सांगोला येथील कविता समाधान आलदर यांच्या तीन दिवसाच्या बाळाची अज्ञात महिलेने चोरी केली असून याबाबत गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून, ती अज्ञात महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याआधारे पोलिस शोध घेत आहेत. शासकीय रूग्णालयातील बाळाची चोरी झाल्याची घटना समजल्यानंतर रूग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.
mirtaj crime news : मिरज शासकीय रूग्णालयातून तीन दिवसाच्या बाळाची चोरी
संशयीत महिला सीसीटीत कैद
कविता आलदार या प्रसुतीसाठी मिरज शासकीय रूग्णालयात दाखल झाल्या होत्या. तीन दिवसापूर्वी त्यांनी मुलाला जन्म दिला होता. रूग्णालयात त्यांच्या सोबत आई व वडील तुकाराम ताय्याप्पा गोरे हे होते. तसेच त्यांच्या सोबत दोन दिवसांपासून एक संशयीत महिलाही वारंवार त्यांच्याशी बोलणे करून संशयीत महिलेने आलदर यांचे आई आणि वडील तुकाराम ताय्याप्पा गोरे तसेच इतर नातेवाई यांच्याबरोबर विश्वास संपादन केला.
ती संशयीत महिलेने आलदर यांच्या आईला म्हणाल्या की माझी चुलत बहिण प्रसुत झाली असून तिचे मुल काचेच्या पेटीत असल्याचे सांगितले. असे म्हणून वारंवार आलदर यांच्या कुटूंबियांसोबत बसून त्यांची सर्व माहिती गोळा केली. कविता आलदर यांचे वडील हे जेवायला गेल्यानंतर तिने संशयीत महिलेने कविता अलदर यांच्याजवळ जावून आई जवळ झोपलेले बाळाला हातात घेवून तुमच्या बाळाला बीसीजी लस सोळा नंबरला टोचायचे असे सांगून त्या तीन दिवसाच्या मुलाला घेवून गेली सोबत तेथे असलेले पेपरही घेवून गेली.
कविता आलदर यांचे आई व वडिलांचे जेवण झाल्यानंतर ते परत मुलगी कविता जवळ आले. त्यावेळी कविता जवळ तीन दिवसाचे बाळ नव्हते. त्यांनी चौकशी केली असता लस टोचायला घेवून गेल्याचे सांगितले. बराचवेळ झाला लस टोचून आणले नाही म्हणून पहायला गेले असता ती संशयीत महिला तीन दिवसाच्या बाळाला घेवून गायब झाल्याचे लक्षात आले. याची माहिती रूग्णालय प्रशासनास समजल्यानंतर सर्वत्र पळापळ सुरू झाली. सीसीटीव्हीचे फुटेच पाहण्यात आले.
संशयीत महिला ही बाळाला घेवून जात असल्याचे चित्रीत झाले असून तसेच रिक्षात बसल्याचे आणि रिक्षाचा नंबरही समजला आहे. या घटनेची माहिती गांधी चौकी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू केला आहे.
mirtaj-crime-news-three-day-old-baby-stolen-from-miraj-government-hospital
तीन दिवसाच्या बाळाच्या चोरीची घटना सर्वत्र पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिरज शासकीय रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा असतानाही या संशयीत महिलेने तीन दिवसाचे महिलेने बाळ चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. आलदर कुटुंबाने मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले असून आमचे बाळ आम्हाला परत मिळवून द्या अशी आर्त हाक रूग्णालय प्रशासनाकडे दिली आहे.
घटना समजल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांचे एक पथक आता बाळ चोरून नेलेल्या महिलेच्या मागावर रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे मात्र मिरजेत एकच खळबळ उडाली आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.