rajkiyalive

मोटारसायकल चोरणारे सराईत आंतरराज्य चोरटे जेरबंद :

मोटारसायकल चोरणारे सराईत आंतरराज्य चोरटे जेरबंद : : सांगली : शहरासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध परिसरातून दुचाकी चोरून त्याची विक्री करणार्‍या सराईत आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून या तिघांकडून चोरीच्या तब्बल 19 दुचाकिंसह 11 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगली शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ सदरची कारवाई केली.

मोटारसायकल चोरणारे सराईत आंतरराज्य चोरटे जेरबंद :

विजय पुंडलिक माने (वय 40 रा. दानोळी), मुर्‍याप्पा नरसिंग हाबगोंड (वय 37 रा. जिरग्याळ ता. जत) आणि अन्सार अक्रम बुरान (वय 21 रा. कागवाड जि. बेळगाव) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. सदरची सर्वात मोठी कारवाई आणि कौतुकास्पद कामगिरी आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मोटारसायकल लावताना काळजी घ्यावी, सुरक्षितता तपासावी असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केली.

सांगली शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.

या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने चोरीच्या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक आज शनिवारी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, संशयित तिघेजण कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी आले आहेत. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी तातडीने याठिकाणी सापळा लावून संशयितांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे असणार्‍या दुचाकीबाबत चौकशी केली असता सदरची मोटारसायकल चोरून आणल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर सांगली आणि कोल्हापूर जिल्हयातील विविध परिसरातून आणखी कसून चौकशी केली असता त्यांनी आणखी 18 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यावेळी पोलिसांनी सदरच्या 19 मोटारसायकली ताब्यात घेतल्या. संशयितांनी सदरच्या दुचाकी चोरून त्यावरील चेसिस नंबर खोडून विक्रीसाठी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानंतर तिघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या 19 दुचाकींसह 11 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक महादेव पोवार, हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील, सचिन शिंदे, मछिंद्र बर्डे, रफिक मुलाणी, संतोष गळवे, गौतम कांबळे, गणेश कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले, सुमित सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

——————————

देशी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरणार्‍या तरुणावर कारवाई : पिस्टल, पितळी काडतुसांसह 50 हजारांचा मुद्देमाल जप्त.

सांगली : शहरातील वसंतदादा औद्योगिक वसाहत येथील ज्युबिली कारखान्याजवळ कोणताही शस्त्र परवाना नसताना देखील स्वतः जवळ देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणार्‍या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली. ऋषिकेश दशरथ शिंदे (वय 22 रा. पाटणे प्लॉट, संजयनगर, सांगली) असे कारवाई केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कॉन्स्टेबल आकाश गायकवाड यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदरची कारवाई हि शुक्रवार दि. 03 मे रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र बाळगणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संजयनगर पोलीस ठाण्याचे एक पथक परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कॉन्स्टेबल आकाश गायकवाड यांना माहिती मिळाली कि, संशयित ऋषिकेश शिंदे हा वसंतदादा औद्योगिक वसाहत येथील ज्युबिली कारखाना ते आरटीओ कार्यालयाकडे जाणार्‍या मार्गावर अवैध शस्त्रे घेऊन थांबला आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी तातडीने त्याठिकाणी सापळा लावून संशयित शिंदे याला पकडले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन पितळेची जिवंत काडतुसे असा मुद्देमाल मिळाला. त्याच्याकडे परवान्याबाबत चौकशी केली असता कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच हे शस्त्र कशासाठी आणि कोणाकडून आणले याबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यावेळी त्याच्याकडून 50 हजार 400 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करत अटक करण्यात आली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज