rajkiyalive

..न झालेले मुख्यमंत्री, स्व. गुलाबराव पाटील

दिनेशकुमार ऐतवडे, सांगली, 9850652056

(gulabrao patil )काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते स्व. गुलाबराव पाटील यांची जयंती रविवारी साजरी झाली. कर्नाटकातील बेनाडी या छोट्याशा गावातून सांगलीत आलेल्या गुलाबराव पाटील यांनी राजकारणात भलतीच मोठी मजल मारली होती. राज्यसभेचे खासदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषविलेल्या गुलाबराव पाटील यांना सहकारातील जाणता राजा म्हणून ओळखले जाते. इंदिरा गांधीच्या किचन कॅबिनेटमधील ते एक विश्वासू सहकारी होते. असे असले तरी राजकारणाचा फटकाही त्यांना त्यांच्या आयुष्यात बसला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदा पर्यंत जावूनही अगदी शेवटच्या क्षणी त्यांना या पदापासून वंचित रहावे लागले.

सध्याच्या परिस्थितीत अगदी अनपेक्षितरित्या उध्दव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आणि एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पड

इंदिरा गांधी यांच्यासोबत चर्चा करताना गुलाबराव पाटील

ली. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही 90 अंशातून वळून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आणि उपमुख्यमंत्रीपद मिळवले. राजकारणात काहीही होवू शकते. याच्या अगोदर अशा काही चमत्कारीक घटना राज्याच्या राजकारणात पडल्या आहेत. ध्यानीमनी नसताना एखादा आमदार मुख्यमंत्री झाला आहे, तर मुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यायची तयारी केली असतानाही दुसर्‍याचीच वर्णी मुख्यमंत्री पदावर लागली आहे.

1982 साली मुळचे बेनाडीचे असलेल्या सांगलीतील गुलाबराव पाटील यांचीही मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली होती. उच्च विद्याविभूषित असलेले गुलाबराव पाटील 1966 ते 1978 असे सलग बारा वर्षे ते राज्यसभेत खासदार होते. त्यानंतर 1981 ते 82 असे दोन वर्षेे ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1983 ते 87 ते राज्याच्या विधानपरिषदमध्येही चांगले काम केले.

1982 मध्ये इंदिरा गांधींना बॅ. अंतुले यांच्या जागी मोठा मराठा नेता मुख्यमंत्री म्हणून नेमायचे होते. गुलाबराव पाटील यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले होतेच. परंतु एकदा नजर फिरवायची म्हणून इंदिरा गांधींनी राज्यातील आमदारांची यादी मागवली. यादीवरून नजर फिरवत असतानाच त्यांना सातार्‍याच्या भोसलेंचे नाव दिसले. बाबासाहेब भोसले हे अंतुले यांच्या मंत्रीमंडळात कायदा मंत्री होते. त्यांना मुख्यमंत्री केल्यास ते आपल्या नियंत्रणात राहतील असे बहुतांश आमदारांना वाटत होते. त्यामुळे त्यांना कुणीच विरोध केला नाही. बाबासाहेब भोसले यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून दिल्लीत जाहीर करण्यात आली. ही बातमी भोसले यांना कळताच त्यांना खरे वाटेना. ते आपल्या शेतातील घरात विश्रांती घेत होते.

हेही वाचा

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

वारसा असूनही… न झालेले आमदार…

72 वर्षात 28 वर्षेच दादा घराण्यात आमदारकी

1980 मध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या आणि केवळ दोन वर्षातच त्यांना मुख्यमंत्री म्हणून नेमण्यात आले. त्यांनी तात्काळ मुंबईला जावून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आजपर्यंतच्या इतिहासात बाबासाहेब भोसले पहिले असे मुख्यमंत्री होते, ज्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपव घेतली आणि नंतर दिल्लीला जावून इंदिरा गांधी यांची भेट घेतली. याबाबत त्यांना काहींनी विचारले असता ते म्हणाले, बाबांनो वेळीच शपथ घेतलेली बरी. ही काँग्रेस आहे. इवे शपथ घेतल्यानंतर राज्यपालांच्या रजिस्टरमध्ये जावून मुख्यमंत्री म्हणून सही करण्यापर्यंत मचला वेळ असतो. त्यावेळेलाही मागच्या मागे कोट ओडून माघारी बोलावले जावू शकते. म्हणून अगोदर शपथ घेतली आणि दिल्लीला जावून इंदिरा गांधींची भेट घेतली.

अशा अशा तर्‍हेने गुलाबराव पाटील यांना केवळ राजकारणामुळे मुख्यमंत्रीपदापासून वंचित रहावे लागले. आपली संधी हुकली तरीही गुलाबराव पाटील यांनी कधीही काँग्रेसवर आपला राग काढला नाही. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी अनेक संस्थांना उर्जितावस्था आणली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत तसेच राज्य सहकारी बँकेत त्यांनी चांगले काम केले. राज्याच्या सहकाराचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्याशिवाय तो इतिहास लिहीता येणार नाही, एवढे मोठे सहकारात त्यांनी काम करून ठेवले आहे.

राज्याच्या राजकारणात यापूर्वीही अशा कित्येक घटना घडल्या आहेत. शह काटशहाच्या राजकारणात अनेकांना मोठी संधी हुकली तर अनेकांना ध्यानीमनी नसतानाही मोठे पद मिळाले आहे. 1978 मध्येही अशी घटना घडली होती. 1978 मध्ये राज्यात कधी नव्हे ती त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. वसंतदादांच्या नेतृत्वाखाली रेड्डी काँग्रेसने 69 जागा जिंकल्या. नासिकराव तिरपुडे यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा काँग्रेसने 99 जागा जिंकल्या. जनता पक्ष आणि त्यांच्या आघाडीचे 135 आमदार निवडून आले. जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजारामबापू पाटील होते. त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी चालून आली होती. जनता पक्षाच्या बैठकीत एस. एम. जोशी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले.

राज्यपाल सादीक अली यांना जॉर्ज फर्नांडीस यांनी अपक्ष आमदारांनी आम्हाला पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे आमचे ज्येष्ठ नेते एस. एम. जोशी यांना मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन्यासाठी बोलवावे, अशी विनंती केली. राज्यपाल सादीक अली यांनीही तशी तयारी केली. राज्यपाल सादीक अली एस. एम. जोशी यांना सरकार बनविण्यासाठी आमंत्रण देणार हे जवळपास निश्चित झाले. ही दोन्ही काँग्रेसमध्ये गेली. रातोरात चक्रे फिरली आणि दोन्ही काँग्रेस एक झाले.

इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस पुन्हा एकदा एकत्र आले आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री तर नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले.
1999 मध्येही विलासराव देशमुख यांनाही मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी झाली होती. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. काँग्रेसचे बड़े नेते राष्ट्रवादीत असल्याने कोणाला मुख्यमंत्री करायचे हा निर्णय 33 दिवस होत नव्हता. अखेर विलासराव देशमुख यांचे नाव निश्चित झाले. 1995 मध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या पाठबळावर उभे राहिल होते.

परंतु सांगलीच्या व्यंकाप्पा पत्कींनी त्यांचा पराभव केला होता. 1999 मध्ये राष्ट्रवादी वेगळी झाल्याचे त्यांच्या पथ्यावर पडले आणि त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. काँग्रेसचे झाडून सर्व नेते राष्ट्रवादीत असल्याने काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नव्हता. त्याचा फायदा त्यांना झाला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज