rajkiyalive

नांद्रेकरांचं ठरलयं कपबशीच

dineshkumar airtawade 9850652056

मिरज तालुक्यातील नांद्रे येथे ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलने सर्वच बाबतीत आघाडी घेतली आहे. यंदा ग्रामविकास पॅनेलच्या सर्वच उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे नांद्रेकरांनी आमचं ठरलयं केवळ कपबशीच अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.

सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलचे पॅनेलप्रमुख एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट आणि अमित पाटील यांनी नियोजन बध्द प्रचारासा सुरूवात केली आहे. अगदी सर्वसामान्य लोकही त्यांना आपण तुमच्यासोबत आहोतच असे सांगत आहेत. ग्रामविकास पॅनेलच्या वाढत्या प्रतिसादामुळे विरोधकात धडकी भरली आहे. विकासकामाच्या जोरावर पाटील गट म्हणजे ग्रामविकास पॅनेल जनतेसमोर जात आहे. आजपर्यंत गेल्या 20 वर्षात तसेच माजी सरपंच राजगोंडा पाटील यांच्या सरपंचपदाच्या काळात केलेल्या विकासाकामामुळे नांद्रेकर खूश असून, यंदा आमचं ठरलयं कपबशीच अशीच चर्चा ऐकायला मिळत आहे.

सामाजिक कार्यकर्ते असणार्‍या महावीर भोरे यांच्या पत्नी सौ. पूजा भोरे यांना सरपंचपदाची तिकीट दिल्याने युवा वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महावीर भोरे यांची अगोदरपासूनच नांद्रेत क्रेझ असल्याने युवा वर्ग झाडून पूजा भोरे यांच्या प्रचारार्थ उतरला आहे. पूजा भोेरे यांचे चिन्ह कपबशी आहे. त्यामुळे नांद्रेत सर्वत्र कपबशीचीच हवा झाली आहे.

पॅनेलप्रमुख एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट आणि स्व. महावीर पाटील गटाचे अमित पाटील यांना मानणारा मोठा गट गावामध्ये आहे. या तीन्ही नेत्यांनी चांगल्या उमेदवांची निवड केली आहे. राजगोंडा पाटील यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा या गटाला फायदा होणार आहे. एन. एस. पाटील यांचे आजपर्यंतचे गावासाठी असणारे योगदानही गावकरी विसरले नाहीत.

पहिल्या टप्प्यात सत्ताधारी पाटील गट, ग्रामविकास पॅनेल प्रचारात आघाडी घेतली आहे. सरपंचपदाचे उमेदवार सौ. पूजा भोरे आणि महावीर भोरे हे आपली भूमिका सर्वसामान्य लोकांना पटवून देण्यात यशस्वी होताना दिसत आहेत.
ग्रामविकास पॅनेलने पहिल्या टप्प्यात प्रचारावर जोर दिला आहे. सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलने चांगले आणि उच्चशिक्षित उमेदवार दिले आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे.

या पॅनेलतर्फे वाडॅ नं 1 मध्ये सत्तार मौला मुजावर व शितलकुमार आप्पासाो कोथळे हे रिंगणात आहेत. वॉड नं. दोन मध्ये हेमलता अरविंद वाले, आण्णासाहेब नेमगोंडा पाचोरे व विलासमती श्र्रीकांत पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर 3 मध्ये दिलीप बाळासाहेब मदने, सुवर्णजित बाबासो काकडे व रंजना मिलिंद कांबळे हे रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर 4 मध्ये दिपाली रमेश साळुंखे, अमितकुमार महावीर पाटील व शालन सुभाष पाचोरे हे निवडणूक रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर 5 मध्ये पल्लवी श्र्रीकांत ठाले, दादासो पासगोंडा पाटील व शफिया गुलाब मुल्ला हे निवडणूक रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर सहा मध्ये जगन्नाथ कृष्णा ठाले, मयुरी बिपीन चौगुले व समिना सरदार मुल्ला हे निवडणूक रिंगणात आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज