rajkiyalive

नांद्रेत सुसज्ज हॉस्पिटल, स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरविणारच

 

 

dineshkumar aitawade, 9850652056

सन्माननिय मतदार बंधू-भगिनींनो….
सप्रेम नमस्कार,

आपल्या नांद्रे ग्रामपंचायतीच्या सन 2023 च्या पंचवार्षिक निवडणुकीस आपण सामोरे जात आहोत. कालखंड पाहिला तर नांद्रे येथील मतदार बंधू-भगिनींनी आमच्या ग्रामविकास पॅनेलच्या अधिकृत उमेदवारांना मतदानरुपी आशीर्वाद देवून समाजसेवेची संधी दिलेली होती. याबद्दल मी प्रथम आपले शतशः आभार मानतो.
मागील काळात गावातील सहाही प्रभागांमध्ये ग्रामस्थांच्या हिताच्या व सोयीच्यादृष्टीने विविध विकासकामांचा पाठपुरावा करुन नळपाणी पुरवठा, गावांतर्गत रस्ते डांबरीकरण, रस्ते काँक्रीटीकरण, गटार, आदी मुलभूत सुविधा व भौतिक विकासकामांची पूर्तता केली आहे.येणार्‍या काळात आमचे पहिले काम आहे ते म्हणजे गावाला स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरविणे आणि नांद्रे जिल्ह्याच्या नकाशावर हायवेवर आणणार 

 

ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त व गतिमान करुन सर्वसामान्य ग्रामस्थांच्या हिताचा व मागण्यांचा गांभीर्याने विचार करुन राज्य शासन, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या व ग्रामपंचायत विविध योजनांच्या माध्यमातून शेकडो पात्र व गरजू लाभार्थीना विविध वैयक्तिक योजनांचाही लाभ देण्यात आलेला आहे.
आपल्या ग्रामविकास पॅनेलच्यावतीने सरपंच पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून सौ. पूजा महावीर भोरे या निवडणुकीस सामोरा जात आहेत. पूजा भोरे यांचे पती महावीर भोरे हे सामाजिक कार्यात अग्रेसर असताना अनेक गोरगरीबांच्या हिताचे कामे त्यांनी या अगोरदही केलेली आहेत. नांद्रे विकास सोसायटीत त्यांनी चेअरमन म्हणून शेतकर्‍यांसाठी चांगले काम केले आहे.

आम्ही एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील, स्व. महावीर पाटील गेल्या कित्येक वर्षांपासून समाजकारणामध्ये सक्रियपणे कार्यरत आहोत. आम्हाला समाजकारणाचा आणि राजकारणाचा मोठा वारसा आहे. गुमट पाटील यांनी कृष्णा खोरे दूध संघात उपाध्यक्ष म्हणून चांगले काम केले आहे. एन. एस. पाटील यांनी शेतकरी बँकेत आपला ठसा उमटविला. राजगोंडा पाटील यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात अनेक विकासाभिमुख कामे केली आहेत. महावीर पाटील यांनी वसंतदादा कारखान्यात चांगले काम केले आहे.

 

नांद्रे गाव कृष्णा नदीपासून दूर आहे. नांद्रेला शेतीसाठी पाणी पहिल्यापासून भेडसावत होता. त्यासाठी घुमट पाटील, एन. एस. पाटील, महावीर पाटील यांनी पाण्याची गरज ओळखून अनेक वर्षापूर्वी पाणीपुरवठा योजना सुरू केल्या त्याचा फायदा आज गावाला झाला आहे. संपूर्ण गाव सुजलाम सुफलाम झाला आहे. आज उस शेतीमध्ये नांद्रे नंबर वन आहे. आपण दिलेल्या संधीचे आम्ही सदैवपणे जाणीव ठेवून गावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहिलो आहोत.
2023 ते 2028 या पंचवार्षिक काळामध्ये आम्ही व आमचे सहकारी गावामध्ये ग्रामस्थ, युवक तसेच महिला भगिनींच्या हिताच्यादृष्टीने पुढील काही उपक्रम हाती घेणार आहोत.

पाचवा मैल ते सांगली हायवे

नांद्रेची लोकसंख्या मोठी आहे. सध्या पाचवा मैल ते सांगली रस्ता अरूंद आहे. या मार्गावर वाहतूकही मोठी आहे. नांद्रे गाव जर हायवेवर आले तर नांद्रेचा विकास मोठ्या प्रमाणात होईल. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. राज्य आणिा केंद्र स्तरावर याबाबतीत पाठपुरावा सुरू आहे. पाचवा मैल ते सांगली हायवे करण्यासाठी आमचे प्राधान्य राहिल. जेणेकरून भविष्यात नांद्रेच्या विकासाला गती येईल.

हेही वाचा

नांद्रेत चर्चा केवळ कपबशीचीच
हरिपूरमध्ये एकहाती भाजपला मतविभागणीचा धोका
नांद्रेत सत्ताधार्‍यांची प्रचारात आघाडी
हरिपूर, नांद्रेमध्ये काटा लढत

नळपाणी पुरवठा योजना :

सध्या गावचा विस्तार वाढत आहे. त्यामुळे गावासह विस्तारित भागात पाणी कमी पडत आहे. सध्याची पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली आहे. पुढील 50 वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून गावामध्ये येणार्‍या काळात दोन मोठ्या टाक्या बांधून गावाला चांगला पाणीपुरवठा करण्यात येईल.
येणार्‍या काळात जलस्वराज्य नळपाणी पुरवठा योजनेचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करुन मुख्य गावठाणासह प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध देण्यात येईल.

सुसज्ज हॉस्पिटल

कोरोना काळात सर्वांबरोबर नांद्रेकरांचेही मोठे हाल झाले. त्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून 50 बेडचे हॉस्पिटल मंज्ाूर केले आहे. त्यांच्या उभारणीसाठी आम्ही प्रयत्न करू. गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सेवा तात्काळ व मोफत उपलब्ध होण्यासाठी त्याची मदत होईल.

स्वच्छता व घनकचरा निर्मूलन :

गावातील गटारींची वेळेवर स्वच्छता करण्यासाठी आवश्यक ते नियोजन ग्रामपंचायतीच्यावतीने केले जाईल.
पाणंद रस्ते सुधारणा : गावातील सहाही वॉर्डामधील शेतकर्‍यांच्या दृष्टीने उपयुक्त असणारे पाणंद रस्त्यांची सुधारणा करण्याचे काम ग्रामपंचायत व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी मिळवून पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न करणार आहोत.

सुसज्ज अभ्यासिका :

गावातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना सरावासाठी परिपूर्ण अभ्यासिकेची सोय ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात येईल.

कळाले आपलेच
एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील घुमट, अमित पाटील.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज