rajkiyalive

नांद्रेत चर्चा केवळ पूजा भोरेंच्या लीडचीच

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056

मिरज तालुक्यातील नांद्रे ग्रामपंचायतीची निवडणूक रविवार 5 रोजी होत आहे. एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट आणि अमित पाटील यांच्या नांद्रे ग्रामविकास पॅनेलला विजयाची खात्री झाली असून, गावात आता केवळ चर्चा आहे ती सरपंचपदाचे उमेदवार सौ. पूजा महावीर भोरे यांना मिळणार्‍या लीडचीच. नांद्रे ग्रामविकास पॅनेलच्या सर्वच उमेदवारांनी सर्वच मतदारांनापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत. सर्वच ठिकाणी त्यांना वाढता पाठिंबा दिसत आहे. सरपंचपदाचे थेट उमेदवार सौ. पूजा महावीर भोरे यांना किती मते मिळतील यापेक्षा ते किती मताने निवडून येतील याचीच चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. त्यांच्या लीडबाबत पैजा लागताता दिसत आहेत.

 

महावीर भोरे यांना आजपर्यंत गावासाठी केलेले काम, पाटील गटाची वाढती क्रेज, एन. एस. पाटील, गुमट पाटील, महावीर पाटील यांना गावासाठी सोडविलेला पाण्याचा प्रश्न आणि राजगोंडा पाटील यांची दूरदृष्टी यामुळे नांद्रे ग्रामविकास पॅनेलचा विश्वास प्रचंड वाढलेला आहे. तरूणांची फौजच्या फौज ग्रामविकास पॅनेलच्या मागेे उभी आहे. महिलांचाही पॅनेलला वाढता पाठिंबा आहे.

प्र्रत्येकाच्या तोंडात केवळ नांद्रे ग्रामविकास पॅनेल आणि कपबशीच ऐकायला मिळत आहे. सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलचे पॅनेलप्रमुख एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट आणि अमित पाटील यांनी प्रत्येकांच्या अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्यास प्राधान्य देत आहेत. प्रत्येक समाज ग्रामविकास पॅनेलच्या पाठिशी खंबीर असून, कपबशीला आता केवळ लीड किती मिळेल याचेच गणीत घातले जात आहे.

अगदी सर्वसामान्य लोकही त्यांना आपण तुमच्यासोबत आहोतच असे सांगत आहेत. ग्रामविकास पॅनेलच्या वाढत्या प्रतिसादामुळे सर्वच उमेदवारांचा आत्मविश्वास वाढला आहे. युवा वर्ग, महिल, अबालवृध्द उत्साहाने प्रचारात भाग घेत आहेत.विकासकामाच्या जोरावर पाटील गट म्हणजे ग्रामविकास पॅनेल जनतेसमोर जात आहे. एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट आणि अमित पाटील यांना राजकारणाचा आणि विकासकामाचा मोठा वसा आणि वारसा आहे. स्वच्छ चारित्र्य, भ्रष्टाचारमुक्त कारभार या जोरावर त्यांनी आजपर्यंत आपली पत टिकवून ठेवली आहे. नांद्रे गाव आणि पाणी म्हटले की पाटील गट अशी जिल्ह्यात ओळख आहे.

नांद्रे गावात प्रवेश केला की पाणी पुरवठा योजनेंची इमारतच याची साक्ष देतात. गावात पत संस्था, दूध संस्था, विकास सोसायटी अगदी सर्वच सहकारी क्षेत्रात पाटील गटाने आपली छाप सोडली आहे.ग्रामविकास पॅनेलने पहिल्यादिवसापून प्रचारात आघाडी घेतली ती शुक्रवारी प्रचार संपेपर्यंत ते आघाडीवर राहिल्याचे चित्र होते. त्यांनी प्रचाराचा टेंप्पो टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ग्रामविकास पॅनेलच्या सर्वच उमेदवारांना विजयाची खात्री पटली आहे. सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलने चांगले आणि उच्चशिक्षित उमेदवार दिले आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे.

या पॅनेलतर्फे वाडॅ नं 1 मध्ये सत्तार मौला मुजावर व शितलकुमार आप्पासाो कोथळे हे रिंगणात आहेत. वॉड नं. दोन मध्ये हेमलता अरविंद वाले, आण्णासाहेब नेमगोंडा पाचोरे व विलासमती श्र्रीकांत पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर 3 मध्ये दिलीप बाळासाहेब मदने, सुवर्णजित बाबासो काकडे व रंजना मिलिंद कांबळे हे रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर 4 मध्ये दिपाली रमेश साळुंखे, अमितकुमार महावीर पाटील व शालन सुभाष पाचोरे हे निवडणूक रिंगणात आहेत.

वॉर्ड नंबर 5 मध्ये पल्लवी श्र्रीकांत ठाले, दादासो पासगोंडा पाटील व शफिया गुलाब मुल्ला हे निवडणूक रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर सहा मध्ये जगन्नाथ कृष्णा ठाले, मयुरी बिपीन चौगुले व समिना सरदार मुल्ला हे निवडणूक रिंगणात आहेत.

एकंदरीत ग्रामविकास पॅनेलच्या सर्वच उमेदवारांना वाढता पाठिंबा दिसत आहे. आता केवळ लीड किती मिळणार याचीच चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज