पोलिस, उत्पादन शुल्क यंत्रणा अलर्टमोडवर ; भेसळीच्या दारूवर ‘उत्पादन शुल्क’ची नजर.
new year news : नववर्षाच्या स्वागताची पहाटे पाचपर्यंत चालणार रंगत : थर्टीफस्ट’ म्हटलं, की सरत्या वर्षाला निरोप अन् नव वर्षाचे उत्साही स्वागत. तरुणाईकडून शहराबरोबरच ग्रामीण भागातही माळरानांवर पार्टीचा बेत… या बाबी नित्याच्याच. यंदा नववर्षाच्या स्वागताची रंगत पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व बार चालकांना पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. दुसर्या बाजूला भेसळीच्या दारूवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथकं तैनात करण्यात आली आहे. तसेच हुल्लडबाजांवर चाप लावण्यासाठी पोलिस दला अलर्टमोडवर आले आहे.
new year news : नववर्षाच्या स्वागताची पहाटे पाचपर्यंत चालणार रंगत
उंबरठ्यावर आलेल्या थर्टीफस्टसाठी जय्यत तयारी सर्वत्र दिसून येत आहे. हॉटेल्स सजले असून अनेक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. हा दिवस अगदी सर्वसामान्यापासून मोठमोठे उद्योजक, फिल्मस्टार उत्साहात साजरा करतात. फटक्यांची आतषबाजी करत गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची तरुणाई जल्लोषात गुंग असते तर रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, चौका-चौकांत नववर्षाच्या स्वागताचे संदेश लिहिले जातात. यंदा पाटे पाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
तर वाईनशॉप रात्री एक वाजेपर्यंत खुले राहतील. एक दिवसाच्या परवान्यासह वर्षिक परवान्यांचेही वितरण करण्यात आले असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले. थर्टीफर्स्टच्या जल्लोषाचा व्यावसायिक फायदा उठवण्यासाठी हॉटेल, ढाबेचालकांनीही अनेक शकली लढवल्या आहेत. काहींनी इतक्या रकमेत पोटभर जेवण, एवढ्या किमतीच्या दारूवर स्नॅक व जेवणाच्या ऑफर्स दिल्या आहेत. दरम्यान, रंगाचा बेरंग करू नये, असे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आले आहे. थर्टीफस्टचा एन्जाय करा, पण नियमांचीही अंमलबजावणी करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यासह शहरातील प्रमुख चौकात नाकाबंदी
हुल्लडबाजांवर चाप लावण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह जिल्ह्यातील प्रमुख चौकात नाकाबंदी करण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणार्यांवर कारवाई केली जाईल. तसेच संवेदनशील ठिकाणी अधिक बंदोबस्त तैनात असेल. याशिवाय पार्टीच्या ठिकाणीही पोलिसांची नजर राहणार आहे. जिल्हा विशेष शाखेने गोपनीय यंत्रणा आता सतर्क केली आहे.
‘‘थर्टीफस्टनिमित्त जिल्ह्यातील बार चालकांना पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी असेल. तसेच वाईन शॉप चालकांना एक वाजेपर्यंत परवानागी राहणार आहे. याशिवाय भेसळीच्या दारूवर नजर ठेवण्यासाठी सहा भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहे. बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी आमची पथके तैनात असणार आहेत. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी करूनच थर्टीफस्टचा एन्जाय करा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी केले आहे.
अशी आहे आतापर्यंतची तयारी….
एक लाख विदेशी दारूचे परवाने वितरीत
25 हजार देशी दारूचे परवाने वितरीत
जिल्ह्यातील गोपनीय यंत्रणा सतर्क
चौका-चौकात नाकाबंदी
मद्य प्रशान चाचणी मशीन उपलब्ध
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.