जनप्रवास । प्रतिनिधी
obc resarvation morcha sangli : हिंमत असेल तर मनोज जरांगेंनी मैदानात यावे : छगन भुजबळ : विधानसभेच्या निवडणुकीत 288 उमेदवार उमे करण्याची भाषा मनोज जरांगे-पाटील करत आहेत. हिम्मत असेल तर त्यांनी मैदानात यावे व निवडणुकीत उमेदवार उभे करावेत, असे खुले आव्हान ओबीसी समाजाचे नेते ना. छगन भुजबळ यांनी दिले. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. यावर राजकीय पक्षाने देखील भूमीका स्पष्ट करावी, असे आव्हान देत ओबीसींच्यावर उठणार्यांना सोडू नका, असा देखील आवाहन त्यांनी केले.
obc resarvation morcha sangli : हिंमत असेल तर मनोज जरांगेंनी मैदानात यावे : छगन भुजबळ
सांगली येथील तरूण भारत स्टेडियमवर ओबीसींचा एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ना. छगन भुजबळ बोलत होते. मेळाव्याला प्रा. लक्ष्मण हाक्के, आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, नवनाथ वाघमारे, मंगेश ससाणे, टी. पी. मुंडे, शब्बीर अन्सारी, इकबाल अन्सारी, रमेश शेंडगे आदी उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ओबीसी नेत्यांची घरे, हॉटेल फोडणे चुकीचे आहे.
ना. छगन भुजबळ पुढे म्हणाले, राज्यात सगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ओबीसी नेत्यांची घरे, हॉटेल फोडणे चुकीचे आहे. आरक्षण मागणे हा गुन्हा नाही, पण ओबीसी नेत्यांना टार्गेट करणे चुकीचे आहे. त्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा देऊन ओबीसींबरोबर आजही आहे. मंत्री, आमदार हे नंतर प्रथम महाराष्ट्र वाचला पाहिजे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. पण ओबीसीमधून आरक्षण देता कामा नये. मनोज जरांगे-पाटील यांनी कुणबी म्हणून आरक्षण घेतले. ओबीसी समाजाचे प्रतिनिधीत्व आम्ही करतो. राज्यात 54 टक्के ओबीसी समाज आहे, पण आरक्षण केवळ 27 टक्के दिले जाते. मग मी आरक्षण खाल्ले असा आरोप जरांगे कसा करतात? असा सवाल ना. भुजबळ यांनी केला.
मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास नाही, अशी ग्वाही दिली आहे.
पण सर्व पक्षांनी मराठा आरक्षणाबाबत भूमीका स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे आव्हान ना. भुजबळ यांनी दिले. ते पुढे म्हणाले, मनोज जरांगे-पाटील यांना आरक्षण अजूनही समजले नाही. लोकसभेच्या-विधानसभा निवडणुकीत ओबीसींना आरक्षण नसते हे देखील त्यांना माहिती नाही. 288 जागा लढविण्याची भाषा ते करत आहेत.
राखीव मतदारसंघात ते मराठा उमेदवार कसे उभे करणार?डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसे आरक्षण दिले समजून घ्यावे.
आर्थिक स्थितीवर आरक्षण दिले जात नाही. ते सामाजिकदृष्ट्या मागास असणार्यांना आरक्षण दिले जाते. सगेसोयर्यांना आरक्षण देणे शक्य नाही. या विरोधात आठ लाख हरकती दिल्या आहेत. उद्या ब्राम्हण समाज देखील उठून ओबीसीतून आरक्षण मागेल, त्यांना आरक्षण कसे देणार? असा सवाल ना. भुजबळ यांनी केला.
प्रा. लक्ष्मण हाक्के म्हणाले, ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. याची आता न्यायालयीन लढा सुरू आहे.
विधानसभा व लोकसभा निवडणुकीत ओबीसींना आरक्षण नाही. त्यामुळे 288 विधानसभेच्या जागांपैकी 50 टक्के जागा हिसकावून घेण्याची तयारी करा. राज्यात ओबीसी समाज 60 टक्के असताना अर्थसंकल्पात केवळ एक टक्के तरतूद केली जाते. मागासवर्गीयांना ओबीसींच्या विरोधात मराठ्याचे नेते जरांगे-पाटील भडकावत आहेत.
मात्र या मागासवर्गीयांच्या अट्रासिटी कायद्याविरोधात मराठा समाजाचे मोर्चे निघाले होते. माझ्यावर अरोप केले जातात, मी भुजबळांचा समर्थक आहे मग जरांगे कोणाचे समर्थक आहेत? महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांची लढाई ही शोषितांची नाही, गरजवंतांची नाही केवळ वर्चस्वाची राजकीय वर्चस्वाची लढाई आहे. तर वाघ नसून मांजर असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
आ. गोपीचंद पडळकर म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण त्यांना वेगळे दहा टक्के आरक्षण द्यावे, तर सगेसोयर्यांना आरक्षण देण्यास विरोध आहे.
मराठा समाजाला देखील असे आरक्षण मिळत नाही, हे त्यांना माहिती आहे. ओबीसींना मराठा समाजातील लोक जातीयवादी म्हणतात, पण या समाजबांधवांनी लोकसभेला मराठ्यांना मतदान केले आहे. त्यामुळे आता पदाधिकार्यांनी खासदार, आमदारांना भेटावे व सगेसोयर्यांबाबत काय निर्णय घेणार? हे लेखी लिहून घ्यावे. तसेच विधानसभेच्या 27 टक्के जागेवर ओबीसींना उमेदवारी द्यावी, अशी मागणी देखील पक्षांकडे करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे आरक्षण दिले आहे त्यानुसार आपण चालले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
भविष्यातील आपली पिढी गुलाम होईल.
माजी आ. प्रकाश शेंडगे म्हणाले, ओबीसीचे राजकीय आरक्षण गेलेच आहे, राहिलेल्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला जातोय. हे टिकले नाही तर भविष्यातील आपली पिढी गुलाम होईल. जरांगे-पाटील शिवीगाळ करतात, पण शिव्यांचा उगम भटक्या वाड्या-वस्त्यांवर झाला आहे. हे लक्षात असू दे. जरांगे पाटील हे ओबीसीमधून आरक्षणाचा अट्टहास करत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. 57 लाख कुणबी दाखले रद्द झाले पाहिजे, वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई लढू, असा इशारा देखील त्यांनी दिला.
यावेळी नवनाथ वाघमारे, लक्ष्मण गायकवाड, मंगेश ससाणे, इकबाल अन्सारी, शब्बीर अन्सारी, जे. डी. तांडेल, अण्णासाहेब डांगे यांनी मनोगत व्यक्त केले.
खासदारांना लांब मिश्या; जयंतराव, विश्वजीत देखील टार्गेट
सांगलीत मेळावा घेण्याचे नियोजन झाले, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्यासाठी ओबीसी पदाधिकार्यांनी काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांची भेट घेतली. पण मेळावा सांगलीत कशाला हवा, असे खा. पाटील पदाधिकार्यांना म्हणाले. यावर आ. गोपीचंद पडळकर खा. विशाल पाटील यांच्यावर निशाणा साधत त्यांना दोन महिन्यात लांब मिश्या आल्या असा टोला लगाविला. तर महापौरपदाच्या निवडणुकीत शेवटच्या पंधरा मिनिटात आ. जयंत पाटील यांनी मैनुद्दीन बागवान मुस्लिम असल्याने त्यांचे नाव वगळून पाहुण्याला महापौर केले होते, असा आरोप देखील त्यांनी केला. तर आ. विश्वजीत कदम यांनी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला ओबीसी मेळावा घेऊन तू काय राष्ट्रपती होणार आहेस काय? असे वक्तव्य केले, आम्ही काय मोठे व्हायचे की नाही? असा सवाल प्रा. लक्ष्मण हाक्के यांनी केला.
वसंतदादांची रस वारसात नाही
वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री होते. ते गोरगरिबांबरोबर असायचे, पण वारसांनी त्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. आम्ही काय तुमची खासदारकी घेत नाही. त्यामुळे मेळाव्याबाबत बोलणे चुकीचे असल्याचे मत ना. भुजबळ यांनी व्यक्त केले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.