palus leptnant news : पलूस येथील जवान लेफ्टनंट अथर्व कुंभार यांचे प्रशिक्षणादरम्यान निधन: पलूस शहराला आज मोठा धक्का बसला आहे. भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर प्रशिक्षण घेत असलेले जवान अथर्व संभाजी कुंभार (रा. पलूस) यांचे मिलिटरी प्रशिक्षणादरम्यान निधन झाले. गया (बिहार) येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी (जढA) मध्ये प्रशिक्षण घेत असताना, 20 किलोमीटर धावण्याच्या सरावादरम्यान त्यांना ’हिट स्ट्रोक’ (उष्माघात) झाल्याने त्यांचे दुःखद निधन झाले.
palus leptnant news : पलूस येथील जवान लेफ्टनंट अथर्व कुंभार यांचे प्रशिक्षणादरम्यान निधन
लेफ्टनंट अथर्व कुंभार यांच्या निधनाने संपूर्ण पलूस शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव उद्या, मंगळवार, 8 जुलै 2025 रोजी सकाळी पलूस येथे आणण्यात येणार आहे.
अथर्व यांचे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्कर हायस्कूल, किर्लोस्करवाडी येथे झाले. पुढे त्यांनी अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, अआष्टा येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इन्फोसिस या नामवंत आयटी कंपनीमध्ये दोन वर्षे सेवा केली. पण मनामध्ये देशसेवेची तीव्र ओढ असल्याने त्यांनी आयटी क्षेत्र सोडून थेट भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयाने त्यांनी लाखोंना प्रेरणा दिली.
palus-leptnant-news-lieutenant-atharva-kumbhar-a-soldier-from-palus-died-during-training
अथर्व यांच्या निधनामुळे कुंभार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परंतु त्यांच्या पराक्रमाची आठवण आणि अभिमान कायमस्वरूपी प्रत्येकाच्या मनात कोरलेला राहील.
अंतिम दर्शन व अंत्यसंस्कार:
वीर जवान लेफ्टनंट अथर्व संभाजी कुंभार यांचे पार्थिव उद्या, मंगळवार, 8 जुलै रोजी सकाळी 08:30 वाजता पलूस येथे घरासमोर अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पलूस शहरातून अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भारतीय सैन्य दलात सेवा बजावणार्या लेफ्टनंट अथर्व कुंभार यांच्या निधनाने देशाने एक युवा आणि होतकरू सैनिक गमावला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.