rajkiyalive

PETH-SANGLI MAHAMARG : रस्ता कामाचा शुभारंभ, निशिकांतदादांच्या होमपिचवर ठरणार जिल्ह्यातील निवडणुकांचा प्लॅन

PETH-SANGLI MAHAMARG : रस्ता कामाचा शुभारंभ, निशिकांतदादांच्या होमपिचवर ठरणार जिल्ह्यातील निवडणुकांचा प्लॅन

 

PETH-SANGLI MAHAMARG : रस्ता कामाचा शुभारंभ, निशिकांतदादांच्या होमपिचवर ठरणार जिल्ह्यातील निवडणुकांचा प्लॅन  इस्लामपुरात भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

 

 

PETH-SANGLI MAHAMARG : रस्ता कामाचा शुभारंभ, निशिकांतदादांच्या होमपिचवर ठरणार जिल्ह्यातील निवडणुकांचा प्लॅन

इस्लामपूर : जनप्रवास

सोमवार दि.8 जानेवारी रोजी राज्याचे कामगार मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.सुरेश खाडे, खा.संजय पाटील यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, विधानसभा, लोकसभा समन्वयक, निवडणुक प्रमुख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदार संघाच्या होमपिचवर विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने एकवटणार आहेत. दुपारी 12 ते 5 यावेळेत प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात सांगली, हातकणंगले लोकसभा व होणार्या विधानसभा निवडणुकांची रणनिती ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातुन होत आहे.

सातत्याने मागणी व आंदोलने ही झाली.

गेल्या 50 वर्षापासुन पेठ-सांगली रस्ता रुंदीकरण व कॉक्रीटीकरण व्हावा अशी अपेक्षा सांगली जिल्ह्यासह अन्य प्रवाशी वर्गाची होती. सातत्याने मागणी व आंदोलने ही झाली. केंद्रातील भाजपा सरकारने या मागणी व अपेक्षाची पुर्तता केली. केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितीन गडकरी यांनी 860.45 कोटी इतका निधी देऊन कामाचे उदघाटन केले होते. राज्याचे कामगारमंत्री या कामाचा प्रत्यक्षात शुभारंभ सोमवार सकाळी 11 वाजता कारंदवाडी येथुन करणार आहेत.

 

भाजपाचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन ना.खाडे यांच्या हस्ते होणार आहे.

दुपारी 11:30 वा. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी वाळवा तालुक्यातील वाळवा, पडवळवाडी, बावची, नागांव, ढवळी, शिगांवमधील रस्ता सुधारणासाठी 712.50 लक्ष निधी दिला आहे. या कामाचे बावचीत उदघाटन होणार आहे. बावची येथील मातंग समाजासाठी 25 लाख खर्चुन बांधलेल्या समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा ना.खाडे यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी 5 वाजता ताकारी रोडवर खुले नाटयगृह येथे केंद्र शासनाचा विकसीत भारत रथास भेट देणार आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी इस्लामपुर शहरात जनसेवेसाठी उभा केलेल्या भाजपाचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन ना.खाडे यांच्या हस्ते होणार आहे.

निशिकांत पाटील यांच्यावर भाजपाने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

सोपावल्यापासुन निशिकांतदादांनी जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघ पिंजुन काढत आढावा घेतला. संघटनात्मक रचनेवर भर दिला. केंद्रातील योजना व मोदी सरकारचे काम घराघरात पोहचविण्याचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याला कानमंत्र देत जिल्ह्याच्या भाजपामध्ये ऊर्जा निर्माण केली आहे. त्यांनी हातकणंगले व सांगली लोकसभासह जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ सर्वाना बरोबर घेऊन जिंकण्यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार मास्टर प्लॅन तयार केल्याचे समजते.

 

 

या बैठकीस ना.सुरेश खाडे, खा. संजय पाटील, आ.सुधीर गाडगीळ, आ.गोपीचंद पडळकर, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे,भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा निताताई केळकर, हातकणंगले लोकसभा निवडणुक प्रमुख सत्यजीत देशमुख, सांगली लोकसभा निवडणूक प्रमुख दिपक शिंदे, माजी आ.राजेंद्र देशमुख, विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख, भगवानराव सांळुखे, नितिन शिंदे, दिनकर पाटील, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, विधानसभा निवडणूक प्रमुख संग्राम देशमुख, प्रभाकर पाटील, सम्राट महाडीक, रवि तम्मनगौंडा पाटील, मोहन वनखंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ.उषाताई दशवंत, इस्लामपुरचे माजी पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

नागरिक जागृती मंचच्या पाठपुराव्याला यश

सांगली-पेठ रस्त्याची निविदा प्रक्रिया झाली, पण प्रत्यक्षात कामाला सुरूवात करण्यासाठी नागरिक जागृती मंचच्यावतीने पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले आहे. या रस्त्याच्या कामासाठी कंपनीकडून मशिनरी दाखल झाल्या आहेत. सोमवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होण्याची आशा आहे. दरम्यान, या कामाची मुदत दोन वर्षे आहे. त्यामुळे 2026 च्या सुरूवातीलाच सांगली-पेठ रस्ता पूर्ण होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा
SANGLI LOKSABHA BJP : लोकसभेला इच्छुक असण्यात गैर काय?
भाजपमध्ये बेकी, पालकमंत्री, खासदार एकाकी
भाजपमध्ये पॅचअप की उमेदवार बदल?
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वच जागा डेंझर झोनमध्ये
हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी
फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही
सांगली लोकसभेसाठी भाजपमध्येच ‘टशन’

सांगली-पेठ हा सुमारे 41 किलोमीटरचा रस्ता गेली अनेक वर्ष चर्चेत आहे.

रस्ता हा वाहतुकीसाठी अत्यंत खराब मानला जातो. पुणे-बेंगलोर महामार्गाला जोडण्यासाठी सांगली-पेठ हा एकच प्रमुख रस्ता असल्यामुळे सदरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नेहमीच वाहतूक असते. अनेकवेळा डांबरीकरणाने रस्त्याची दुरूस्ती केली जात होती. मात्र चार-सहा महिन्यात रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडत होते. अनेक अपघात देखील झाले, अनेकांचे बळी गेले. त्यामुळे नागरिक जागृती मंचच्यावतीने विविध आंदोलने करण्यात आली. आंदोलनानंतर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला.

महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आराखडा तयार केला.

केंद्राने याला मान्यता दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी 881 कोटी 87 लाख रूपये मंजूर केले. निविदा प्रक्रिया झाली. जयपूर (राजस्थान) येथील आर. एस. बी. इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला रस्त्याच्या कामाला ठेका मिळाला. प्रत्यक्षात कामाला सुरूवात न झाल्याने नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी पाठपुरावा केला होता. अखेर कंपनीकडून मशिनरी दाखल झाली आहेत. सोमवारी या कामाला सुरूवात होणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज