pngnews : पीएनजीच्या ‘गीत रामायण’ कार्यक्रमाने रसिक प्रेक्षक भारावले : सांगलीतील 192 वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढीच्या मिरज शाखेच्या तिसर्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत ‘गीत रामायण’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम बालगंधर्व नाट्यमंदिरात उत्साहात पार पडला.
pngnews : पीएनजीच्या ‘गीत रामायण’ कार्यक्रमाने रसिक प्रेक्षक भारावले
गीतकार ग.दि.माडगूळकर यांच्या उत्स्फूर्त लेखणीतून साकारलेले आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या संगीताने गीत रामायण अजरामर झाले आहे. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कीर्तनकार हृषीकेश बोडस आणि सुप्रसिद्ध डॉ.जी. एस. कुलकर्णी, पीएनजीचे संचालक आमदार सुधीर गाडगीळ,राजीव गाडगीळ, सौ. मंजिरी गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर स्वरवैभव क्रिएशन्स, सांगली यांच्या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला. श्रीरंग जोशी, सुकृत ताम्हनकर, कीर्ती पेठे या गायकांनी गीत रामायणातील एक एक गाणी सादर करताना प्रेक्षक भारावून जात होते. स्वये श्री राम प्रभू, राम जन्मला ग सखे, स्वयंवर झाले सीतेचे, माता न तू वैरिणी अशा विविध गाण्यांनी कार्यक्रमांत रंगत आणली.
pngnews-pngs-geet-ramayana-program-enthralled-the-audience
त्यांना भास्कर पेठे, प्रशांत भाटे, परेश पेठे, कृष्णा साठे, अक्षय कुलकर्णी यांनी संगीत साथ केली. कार्यक्रमाचे निवेदन शशांक लिमये यांनी केले तर परेश पेठे हे या कार्यक्रमाचे संगीत संयोजक व निर्माता होते. यावेळी सरव्यवस्थापिका शुभांगी कुलकर्णी, मिरज शाखा व्यवस्थापक प्रदीप पुराणिक,अभिषेक प्रभुदेसाई मार्केटिंग विभाग हेड प्रशांत आरबळी,महेंद्र कालेकर यांच्यासह शाखेचा स्टाफ उपस्थित होता.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.