rajkiyalive

प्रतिक पाटील हातकणंगलेतून लोकसभेच्या रिंगणात?

कोल्हापुरातील दोन्ही जागांवर शरद पवार गटाचाही दावा

शरद पवारांसमोर पदाधिकार्‍यांकडून उमेदवारीची मागणी

 

मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून दावा करण्यात आला असतानाच आता शरद पवार गटाकडूनही दावा करण्यात आला आहे. कोल्हापूरमधून जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकसभानिहाय आढावा बैठकीत शरद पवारांकडे एकमुखाने मागणी पदाधिकर्‍यांकडून करण्यात आली.
दोन्ही मतदारसंघावर शरद पवार गटाकडून दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यावेळी बैठकीत कोल्हापुरातील दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आली असून, मविआच्या जागावाटपातही हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडेच घेण्याची विनंती पदाधिकार्‍यांनी घेतली.

हेही वाचा
जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार
खुजगावचे धरण आज असते तर…..राजारामबापुंची आठवण
जयंत पाटलांना घेरण्यासाठी महाडिकांची तयारी
राज्यात चर्चा केवळ जयंत पाटलांचीच…
वारसा असूनही… न झालेले आमदार...

यावेळी, खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, एकनाथ खडसे, आमदार बाळासाहेब पाटील, अशोक पवार, माजी आमदार कोषाध्यक्ष हेमंत टकले, राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, महिला प्रदेशाध्यक्षा ड. रोहिणीताई खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष
मेहबुब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर आदी उपस्थित होते.

सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादीची तिसरी पिढी सक्रीय
दुसरीकडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र व राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक जयंत पाटील यांनी अलीकडेच सरकारच्या कंत्राटी भरतीवर जोरदार टीका केली होती. त्याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तिसरी पिढीही सरकार विरोधात सक्रीय होताना दिसत आहे. कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठीच्या ’वेगवान’ हालचाली सुरू केलेल्या आहेत.

यांच्या वेगाला कात्री लावण्याची जबाबदारी आपली आहे असे आवाहन त्यांनी तरुणांना ट्विटमधून केले होते. 11 हजार जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नोव्हेंबरपर्यंत 1 लाख जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार असल्याची माहिती आहे. यावरून त्यांनी टीकास्त्र सोडले.

( ए.बी.माझाच्या सौजन्याने)

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज