rajkiyalive

PRATIK PATIL NEWS : हारतुर्‍याला फाटा देत प्रतिक पाटील यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा

इस्लामपूर ः प्रतिनिधी
PRATIK PATIL NEWS : हारतुर्‍याला फाटा देत प्रतिक पाटील यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा : राजारामबापू पाटील सह.साखर कारखाना व राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, युवा नेते प्रतिक पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या सहकार्‍यांनी हार-तुर्‍यांच्या पारंपरिक शुभेच्छांना फाटा देत विविध लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा केला. यामध्ये वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, स्वच्छता मोहीम, विद्यार्थ्यांना वह्या वाटप आदींसह रिल्स, चित्रकला स्पर्धेचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि राजारामबापू समूहातील पदाधिकारीही वाळवा तालुक्यातील गावोगावी विविध उपक्रम राबवित आहेत.

PRATIK PATIL NEWS : हारतुर्‍याला फाटा देत प्रतिक पाटील यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा

वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वाळवा तालुक्यातील गावोगावी 10 हजार वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणार आहेत. प्रतिक वृक्षारोपण अभियान या नावाने हा उपक्रम राबविला जात आहे. सध्या पर्यावरणाचा र्‍हास होऊन समाजाला अतिवृष्टी, महापूर, वाढते तापमानसारख्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

यामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून ’युवक’च्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे.

इस्लामपूर शहर युवक राष्ट्रवादीच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये इस्लामपूर बसस्थानकाची स्वच्छता करून बस स्थानकातील खड्डे मुजविले जाणार आहेत. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, युवा नेते प्रतिक पाटील यांच्या मार्गदर्शना खाली समाजातील गोरगरीब, दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचे अश्रू पुसण्याचे काम करीत असलेल्या जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानच्या माध्यमातून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा उपक्रम राबविला जात आहे.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश म्हाळुंगकर हे कारखाना कार्यस्थळावरील दवाखान्यात लिज्जत पापड उद्योग समूह व कारखान्याच्या डिस्टीलरीतील महिलांची आरोग्य तपासणी व उपचार करीत आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यास विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाळवा तालुका राष्ट्रवादी सोशल मिडियाने प्रतिक पाटील यांच्या कार्याला उजाळा देणारी राज्यस्तरीय रिल्स स्पर्धा घेतली आहे. स्पर्धेत संपूर्ण राज्यातून रिल्स स्पर्धक सहभागी झाले आहेत.

समडोळीत प्रतिक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच सुनिता हजारे, माजी उपसरपंच प्रमोद ढोले, कृष्णाजी मसाले, ग्रामपंचायद सदस्या क्रांती पाटील, देशभूषण पाटील, सर्वोदय कारखान्याचे कर्मचारी दीपक भोरे, चंद्रकांत गर्जे, कुमार जाधव, अरूण मस्कर आदी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज