rajkiyalive

पृथ्वीराज देशमुख यांच्या ऑडिओ क्लिपची पडताळणी करुन प्रदेशकडे पाठविणार

शिस्त मोडल्यास कारवाई अटळ ः जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील

जनप्रवास । प्रतिनिधी
पृथ्वीराज देशमुख यांच्या ऑडिओ क्लिपची पडताळणी करुन प्रदेशकडे पाठविणार : सांगली ः लोकसभा निवडणुकीमध्ये माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या ऑडिओ क्लिपची पडताळणी करुन प्रदेशकडे पाठविण्यात येणार आहे. पक्षाची शिस्त मोडली असेल तर निश्चित कारवाई होईल, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पृथ्वीराज देशमुख यांच्या ऑडिओ क्लिपची पडताळणी करुन प्रदेशकडे पाठविणार

पृथ्वीराज देशमुख यांच्या ऑडिओ क्लिपची पडताळणी करुन प्रदेशकडे पाठविणार : मागील आठवड्यत लोकसभा निवडणूक पार पडली, निवडणुकीत पक्षांतर्गत स्थानिक नेत्यांमध्ये झालेेले वाद बाहेर येत आहेत. जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत देश आणि राज्य पातळीवरुन लोकसभेसाठी जो उमेदवार दिला जाईल, त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. याबाबत माजी आमदार विलासराव जगताप यांनी जाहीर केले होते.

प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगली लोकसभेसाठी पक्षाने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुुळे जिल्ह्यातील नेत्यांनी पक्षाचे काम करणे आवश्यक होते.

माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे लोकसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराचे काम करण्याचा आदेश देत असल्याची ऑडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे पक्षांतील नेत्यांनी उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचे निदर्शना आले आहे. ऑडिओ क्लिप व्हायरलप्रकरणाची पडताळणी केली जात आहे.

पडताळणीनंतर ऑडिओ क्लिपचा अहवाल प्रदेशकडे पाठविला जाईल. माजी जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी पक्षाची शिस्त मोडल्याचे स्पष्ट झाले तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल, असे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज