rajkiyalive

RAJARAMBAPU KARKHANA : राजारामबापू सह. साखर कारखान्याच्या चारही युनिटचे वजनकाटे अचूक

RAJARAMBAPU KARKHANA : राजारामबापू सह. साखर कारखान्याच्या चारही युनिटचे वजनकाटे अचूक : वैध मापनशास्त्र खात्याचा अहवाल सांगली जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून राज्य शासनाच्या वैध मापनशास्त्र खात्याच्या भरारी पथकाने राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे,वाटेगाव-सुरुल, कारंदवाडी व तिप्पेहळ्ळी (जत) युनिटला अचानक भेट देऊन कारखान्याच्या संगणकीय वजन काट्यांची पडताळणी केली. यानंतर राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या चारही युनिटचे वजन काटे अचूक असल्याचा अहवाल वैध मापनशास्त्र खात्याने दिला आहे. यावेळी प्रशासन व पोलीस खात्याचे अधिकारी तसेच शेतकरी व वाहन मालक उपस्थित होते.

 

RAJARAMBAPU KARKHANA : राजारामबापू सह. साखर कारखान्याच्या चारही युनिटचे वजनकाटे अचूक

 

इस्लामपूर : प्रतिनिधी

वैध मापनशास्त्र विभागाचे निरीक्षक योगेश अग्रवाल यांनी साखराळे,वाटेगाव- सुरुल व कारंदवाडी युनिटच्या तर वैध मापन शास्त्र खात्याचे निरीक्षक उदय कोळी यांनी तिप्पेहळ्ळी-जत युनिटच्या वजन काट्यांची तपासणी केली आहे. त्यांनी प्रथम पोलीस व प्रशासन विभागाचे अधिकारी,तसेच ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदारां समोर कारखान्यात ऊस घेऊन आलेली वाहने व रिकाम्या वाहनांच्या वजनाची पडताळणी केली.

 

 

त्यानंतर त्यांनी लोखंडी वजने कारखान्याच्या वजन काट्यांवर ठेवून वजनाची तपासणी केली. यामध्ये त्यांना कोणतीही तफावत आढळली नाही. त्यांनी सर्व काटे अचूक असल्याचा कारखान्यास अहवाल दिला आहे. साखराळे येथे लेखा परीक्षक दत्तात्रय माळी,पोलीस हवालदार विलास थोरबोले, वाटेगाव-सुरुल येथे कासेगाव मंडल अधिकारी एस.एस. पटेल,कासेगाव सपोनि भालचंद्र देशमुख,बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी.जी.पाटील, कारंदवाडी येथे नायब तहसिलदार रमेश रजपूत,आष्टा सपोनि आण्णासो बाबर,लेखा परीक्षक तातोबा नायकवडी, प्रमोद भिसे, तिप्पेहळ्ळी-जत येथे तहसिलदार जीवन बनसोडे, नायब तहसिलदार ए.बी.दोडमाळ,जत सपोनि वैभव मार्कंड,लेखा परीक्षक एम.डी.वझे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी उत्पादन वाढीसाठी सेंद्रीय खतांचा योग्य वापर करावा : प्रतिक पाटील

फोटो- राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ’राजाराम समृध्द सेंद्रीय खत उत्पादन प्रकल्पा’च्या स्थलांतरीत इमारतीच्या उदघाटनप्रसंगी प्रतिकदादा पाटील,विजयराव पाटील,प्रदीपकुमार पाटील, प्रताप पाटील,अतुल पाटील,शैलेश पाटील, आर.डी.माहुली,तसेच संचालक व अधिकारी

जमिनीची सुपीकता,पोत राखत उत्पादन वाढीमध्ये सेंद्रीय व जैविक खतांचा वापर अतिशय महत्वाचा आहे. आपल्या परिसरातील शेतकर्‍यांना कमी किंमतीत, दर्जेदार सेंद्रीय व जैविक खते उपलब्ध करून देत आहोत. ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी उत्पादन वाढीसाठी सेंद्रीय व जैविक खतांचा योग्य वापर करावा. असे आवाहन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी केले.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ’राजाराम समृध्द सेंद्रीय खत उत्पादन प्रकल्पा’च्या स्थलांतरीत इमारतीच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. ’राजारामबापू’चे उपाध्यक्ष विजयराव पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, जल सिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीप कुमार पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी जनरल मॅनेंजर विजय मोरे, सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर, ऊस विकास अधिकारी सुजय पाटील, माणिक पाटील, चंद्रकांत गायकवाड, सतिश गुरव, इरफान पठाण यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिक पाटील म्हणाले, सध्या राखेपासून पोटॅश निर्मितीवर संशोधन सुरू आहे. आपणही भविष्यात आपल्या नवीन इन्सीनरेशन बॉयलरमधून निघणार्‍या राखे पासून पोटॅश निर्मिती करणार आहोत. आपल्या परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञान व अद्यावत सोई-सुविधा देण्याचा आपला प्रयत्न आहे. शेतकर्‍यांनी त्याचा लाभ घ्यावा. यावेळी ऊस विकास अधिकारी सुजय पाटील यांनी प्रकल्पाची माहिती दिली. प्रगतशील शेतकरी अमोल लंकेसर यांनी समृध्द खत वापरण्याचे फायदे सांगितले.

प्रारंभी कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक दादासाहेब मोरे, रघुनाथ जाधव, बबनराव थोटे, दिलीपराव देसाई, प्रताप पाटील,शैलेश पाटील,अतुल पाटील, प्रा.डॉ. योजना शिंदे-पाटील,राजकुमार कांबळे, सचिव डी.एम.पाटील, महेश पाटील,अनिल पाटील, एस.डी.पाटील, ऊस उत्पादक शेतकरी किरण काळोखे,प्रशांत माणगावे, जगदीश पाटील यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, गटाधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी आभार मानले

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज