rajkiyalive

rajarambapu karkhana news : राजारामबापू कारखाना ठेवींवरील व्याज 11 ऑक्टोबरला जमा करणार ः प्रतिक पाटील

इस्लामपूर : प्रतिनिधी
rajarambapu karkhana news : राजारामबापू कारखाना ठेवींवरील व्याज 11 ऑक्टोबरला जमा करणार ः प्रतिक पाटील : राजारामबापू पाटील सह. साखर कारखान्याने सहवीज प्रकल्प व विस्तार वाढीसाठी घेतलेली प्रतिटन 147 रुपये ठेव दोन टप्प्यात ऊस उत्पादक शेतकर्‍यांना परत केली आहे. या ठेवींवरील तसेच रुपांतरीत ठेवींवरील व्याज एकूण रक्कम 3 कोटी 44 लाख येत्या 11 ऑक्टोबरला ऊस उत्पादक सभासद शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करीत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी दिली

rajarambapu karkhana news : राजारामबापू कारखाना ठेवींवरील व्याज 11 ऑक्टोबरला जमा करणार ः प्रतिक पाटील

प्रतिक पाटील म्हणाले, आपण माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 2014 साली सहवीज व विस्तार वाढीचा महत्वकांक्षी प्रकल्प यशस्वी पूर्ण केला. प्रकल्पासाठी प्रतिटन 147 रुपयांची ठेव ऊस उत्पादक सभासद शेतकर्‍यांकडून 24 कोटी 15 लाख इतकी घेतली. यातील प्रतिटन 75 प्रमाणे 12 कोटी 35 लाख दि.1 नोव्हेंबर 2023 रोजी, उर्वरित 72 प्रमाणे 11 कोटी 80 लाख दि.1 ऑगस्ट 2024 रोजी ऊस उत्पादक सभासद शेतकर्‍यांना परत केले आहेत.

यावरील व्याज 2 कोटी 89 लाख 56 हजार तसेच रुपांतरीत ठेव रक्कम 4 कोटी 80 लाखावरील व्याज 54 लाख 1 हजार असे एकूण 3 कोटी 44 लाख दि.11 ऑक्टोबरपर्यंत शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करीत आहोत. सभासदांनी आमच्यावर जो विश्वास दाखविला होता,तो आम्ही सार्थ केला आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, माल खरेदी समितीचे अध्यक्ष देवराज पाटील, बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, कार्यकारी संचालक आर.डी. माहुली, सचिव डी.एम.पाटील, मुख्य लेखापाल संतोष खटावकर, जयकर फसाले प्रामुख्याने उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज