rajendra yadravkar news : आमदार यड्रावकर जात-पात बाजूला ठेवून ते प्रत्येकाच्या सेवेसाठी उभे : खा. धैर्यशील माने: लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा आदर्श आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दाखवून दिला आहे. त्यांनी जातीपातीच्या भिंती पाडून शिरोळ तालुक्यात विकासाचं मंदिर उभं केलं आहे. यामुळे या निवडणुकीत त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
rajendra yadravkar news : आमदार यड्रावकर जात-पात बाजूला ठेवून ते प्रत्येकाच्या सेवेसाठी उभे : खा. धैर्यशील माने
महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारासाठी दानोळी येथे सभा झाली. सभेपूर्वी धर्मवीर चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणारे क्षितिज दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली. स्वागत अरुण होगले यांनी केले.
आमदार यड्रावकर म्हणाले की, शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधांच्या सुधारण्यासाठी उदगाव येथे मेडिकल हब उभारण्यात येत आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
या सभेला सतिश मलमे, प्रमोददादा पाटील, चंद्रकांत मोरे, संजय देसाई, उदय झुटाळ, राकेश खोद्रे, सरपंच सुनीता वाळकुंजे, माजी सरपंच बापूसो दळवी, गुंडू दळवी, केशव राऊत, धन्यकुमार पाराज, विकास वाळकुंजे, अनिल कांबळे, सिताराम माने, बादशहा तांबोळी, संजय माने, विलास काटकर यांच्यासह पंचक्रोशीतील गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर आणि गावातील ग्रामस्थ बहुसंख्य उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.