कोल्हापूर :
raju shetti news : राजू शेट्टी यांनी चळवळीचा बाजार मांडला, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांची टीका : राजू शेट्टी यांनी शेतकरी चळवळ मोडीत काढली आहे. रात्रीच्या अंधारात घडामोडी करीत चळवळ बाजारात विक्रीला नेण्याचे काम त्यांनी केले आहे, अशा परखड शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी तोफ डागली.
raju shetti news : राजू शेट्टी यांनी चळवळीचा बाजार मांडला, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांची टीका
स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून वैभव कांबळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हेही उपस्थित होते. तथापि त्यानंतर झालेल्या घडामोडीमध्ये उल्हास पाटील व डॉ. सुजित मिणचेकर या उद्धव ठाकरे शिवसेनेतील माजी आमदारांनी स्वाभिमानी मध्ये प्रवेश केला. त्यानंतर या दोघांनाही पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली.
या प्रकारावर बोलताना हातकणगले राखीव मतदार संघातून निवडणूक लढवणारे वैभव कांबळे यांनी राजू शेट्टी यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, माझा अर्ज भरण्यासाठी स्वतः राजू शेट्टी उपस्थित होते. पण रात्रीत अशा काय घडामोडी घडल्या की त्यामध्ये सामान्य कार्यकर्त्याची उमेदवारी कापली गेली. एकीकडे शेट्टी लाठीकाठी खाणार्या, तुरुंगात जाणारे कार्यकर्त्याला उमेदवारी देणार असे म्हणतात. या निकषांमध्ये आता उमेदवारी दिलेली नेमके कोठे बसतात.
गेली वीस वर्षे स्वाभिमानी संघटनेची चळवळ लढत असताना 15 गुन्हे दाखल झाले आहेत. दहा वेळा तुरुंगवास झाला आहे. तरीही प्रामाणिक कार्यकर्त्याची उमेदवारी कापली गेली आहे. राजू शेट्टी यांच्या या कारनाम्यांचा पर्दाफाश लवकरच करणार आहे, असेही वैभव कांबळे म्हणाले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.