दिनेशकुमार ऐतवडे
सलग दोन लोकसभेला पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मरगळ आली आहे. शेतकर्यांसाठी लढणार्या कार्यकर्त्यांचे मनोबल खालावत आहे. त्यांना आता कोणत्याही परिस्थितीत एका विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे राजू शेट्टी स्वत: विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची गरज आहे.
raju shetti news : संघटनेतील मरगळ झटकण्यासाठी शेट्टी स्वत: मैदानात उतरण्याची गरज
शिरोळ विधानसभा मतदार संघ हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला जिल्हा परिषद सदस्य ते लोकसभा सदस्य व्हाया विधानसभा सदस्य असा प्रवास राजू शेट्टींचा झाला आहे. एकदा राजू शेट्टींनी शिरोळमधून विधानसभा गाठली होती. त्यानंतर त्यांनी लोकसभेच्या मैदादान उतरले एकदा निवेदिता माने आणि त्यानंतर कल्लापाण्णा आवाडे यांचा पराभव करून राजू शेट्टी देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आली होती. परंतु त्यानंतर सलग दोन लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकाराला लागला. गत निवडणुकीत तर त्यांना तिसर्या क्रमांकावर रहावे लागले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि मरगळ आली आहे.
स्वाभिमानीचा गड टिकवून ठेवायचा असेल तर आता राजू शेट्टींना स्वत शिरोळच्या मैदानात उतरावे लागेल. शिरोळ पूर्ण तालुकाच शिरोळ विधानसभा आहे. कार्यकर्त्यांचा संच तयार आहे. त्यामुळे लोकसभेच्या मैदानापेक्षा शिरोळ सर करणे त्यांना सोपे जाईल. शिरोळ काँग्रेसकडे की शिंदे गटाकडे असा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत राजू शेट्टी मैदानात असतील तर तिरंगी लढतीचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.