rajkiyalive

RAJU SHETTI : शिरोळमध्ये स्वाभिमानीला सावध पावले उचलावे लागणार

जयसिंगपूर /अजित पवार

RAJU SHETTI : शिरोळमध्ये स्वाभिमानीला सावध पावले उचलावे लागणार : लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील राजकीय संदर्भ आता बदलले आहेत. महाविकास आघाडी कडून माजी आमदार उल्हास पाटील अथवा दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील तर महायुतीकडून विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे तगडे आव्हान समोर येऊन ठेपणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानसभा गाठायची असेल तर सावध पावले उचलावी लागणार आहेत.

RAJU SHETTI : शिरोळमध्ये स्वाभिमानीला सावध पावले उचलावे लागणार

RAJU SHETTI : शिरोळमध्ये स्वाभिमानीला सावध पावले उचलावे लागणार : नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी बाजी मारली आहे. शिरोळ तालुक्यात त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सरूडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर मात करून तालुक्यात मताधिक्य मिळवले आहे. हे मताधिक्य मिळवण्यात विद्यमान आमदार आणि माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा मोलाचा हातभार लागल्यानेच माने यांचा विजय सुकर झाल्याचे बोलले जात आहे.

भविष्यात काही दिवसात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी अनेक दिग्गज मैदानात उतरणार आहेत. विद्यमान आमदार आणि माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी लोकसभेच्या माध्यमातूनच विधानसभेच्या प्रचाराची पेरणी केली केल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.

आपली यंत्रणा सक्षम असल्याचे धैर्यशील माने यांना मिळालेल्या मताधिक्यातूनच त्यांनी वरिष्ठांना दाखवून दिले आहे. यामुळे यड्रावकर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा ताकदीने निवडणूक लढविणार हे मात्र निश्चित आहे. त्यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच तालुक्याच्या विकास कामांची गंगा अटकेपार नेली आहे. यामुळे आपकी बार पुन्हा यड्रावकर अशी स्थिती तालुक्यात पहावयास मिळेल.

RAJU SHETTI : शिरोळमध्ये स्वाभिमानीला सावध पावले उचलावे लागणार : तर विरोधी महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सरूडकर यांना मताधिक्य मिळाले. मिळालेले मताधिक्य हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी आमदार उल्हास पाटील आणि दत्त कारखान्याचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील यांनी ताकद उभी केल्याने सत्यजित पाटील यांना मताधिक्य मिळाले.

माजी आमदार उल्हास पाटील आणि गणपतराव पाटील यांनी तालुक्यात पुन्हा एकदा आपण कुठे कमी नाही. याचा नारा या माध्यमातून दिला आहे. पण भविष्यात या दोघांपैकी कोणाही एकट्याला लढावे लागणार आहे. हे लक्षात ठेवून सावधपणे पावले टाकली जात असावीत असे बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना लोकसभेच्या निवडणुकीत पडलेली मते विचारात घेतली तर होम ग्राउंडवरच पीछेहाट झाल्याचे बोलले जात आहे. चळवळ टिकली पाहिजे हा उदात्त हेतू त्यांनी डोळ्यासमोर ठेवून कोणाच्या दावणीला चळवळ बांधली जाऊ नये याकरता एकला चलो रे चा नारा त्यांनी या निवडणुकीत दिला होता. पण विधानसभेच्या निवडणुकीत यापूर्वी दोन वेळा सावकार मादनाईक यांना पराभव पत्करावा लागला आहे.

याचा विचार करून राजू शेट्टी यांनी विधानसभा गाठायची असेल तर सावध पावले टाकली पाहिजेत. असे राजकीय जाणकारातून बोलले जात आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नगण्य अस्तित्व….

राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले आहेत. यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट झाले आहेत. पण शिरोळ तालुक्यात या दोन्ही गटाचे अस्तित्व नगण्य आहे. दोन्ही गटाच्या पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे नेते तालुक्यात कोठे वावरताना दिसत नाहीत.

लोकसभा निवडणुकीत मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उर्वरित कार्यकर्ते प्रचारात परस्पर विरोधी उमेदवारांचा प्रचार करताना दिसत होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज