RAJU SHETTI : स्वाभिमानी राजकारणाची दिशा बदणार : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदार संघातून, दोन वेळा खासदार असणार्या राजू शेट्टी यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले होते. परंतु लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी खचून न जाता चळवळीचा निखारा पेटता ठेवून राज्यभर विविध प्रश्नासाठी आंदोलने, मोर्चे चालूच ठेवावेत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पक्षाच्या राज्य कार्यकारणीत बोलताना केले. येथून पुढे राजकारणाची दिशा बदलावी लागणार असल्याचे यावेळी सर्वांनी भूमिका मांडली.
RAJU SHETTI : स्वाभिमानी राजकारणाची दिशा बदणार
22, 23 रोजी बारामतीत राज्य कार्यकारिणीची बैठक
लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यातील सर्व पदाधिकारी यांची आज ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभेतील अपयशानंतर स्वाभिमानीची राजकीय व चळवळीच्या पुढील ध्येय धोरणासंदर्भात राज्यातील पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वच पदाधिकारी यांनी इथून पुढे शेतकरी आंदोलन व चळवळीशी प्रतारणा न करता प्रामाणिकपणे करावी व स्वाभिमानीचे राजकारण वेगळ्या पध्दतीने करावे अशा पध्दतीचे भुमिका मांडण्यात आली.
या भूमिकेला राज्यातील सर्वच पदाधिका-यांनी आपला एकमुखी पाठिंबा देत लवकरच याबाबत बारामती येथे 22 व 23 जून रोजी राज्य कार्यकारणीची बैठक घेऊन पुढील दिशा स्पष्ट करण्याचे ठरले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मोर्चे व आंदोलने करून शेतक-यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवायचा आहे. याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी , प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील व संदीप जगताप यांच्या नेतृत्वात विविध प्रश्नावर राज्यभर दौरे सुरू करण्यात येणार आहेत.
त्याबरोबरच विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर आल्याने कोल्हापूर , सांगली , सातारा ,पुणे , सोलापूर , लातूर , नांदेड , परभणी , अमरावती , बुलढाणा , नाशिक , नंदुरबार या जिल्ह्यातील विविध विधानसभेच्या जागेसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुका लढविण्याबाबत तसेच महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपात अनेक चांगले उमेदवारांना तिकीट मिळणार नसल्याने आपापल्या विधानसभा मतदारसंघात सक्षम उमेदवारांची चाचपणी करून विधानसभेला पुर्ण ताकदीने उमेदवार उभे करण्याची चर्चा झाली.यावेळेस राज्यातील सर्व राज्य कार्यकारणीची प्रमुख पदाधिकारी ऊपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.