rajkiyalive

RASHTRAWADI CONGRESS : नवा पक्ष, नवे चिन्ह तरीही राज्यात चांगले स्थान

राष्ट्रवादीचा आज वर्धापनदिन

दिनेशकुमार ऐतवडे

RASHTRAWADI CONGRESS : नवा पक्ष, नवे चिन्ह तरीही राज्यात चांगले स्थान : 10 जून 1999 रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठी
फूट पडली. हाताच्या बोटावर मोजावे एवढे आमदार आणि खासदार शरद पवारांसोबत राहिले. पण त्यांचे कॅप्टन जयंत पाटील यांनी डोके शांत ठेवून वाटचाल सुरू ठेवली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली 10 जागा लढविण्यात आल्या. त्यापैकी आठ जागांवर विजय मिळविला. गेल्या 25 वर्षात राष्ट्रवादी पक्षात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. परंतु पहिल्या दिवसापासून पक्षाशी एकनिष्ठ असणार्‍या कॅप्टन कुल जयंत पाटील यांच्यामुळे आजही राज्यात राष्ट्रवादी चांगल्या स्थानावर आहे. आज पक्षाचा वाढदिवस…त्यानिमित्ताने

RASHTRAWADI CONGRESS : नवा पक्ष, नवे चिन्ह तरीही राज्यात चांगले स्थान

पंचवीस वर्षापूर्वी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. शरद पवार बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. हाताच्या चिन्हावर लढणार्‍या अनेक आमदार, खासदारांना घड्याळ या चिन्हावर लढावे लागले. यंदाही तीच परिस्थिती झाली. परंंतु गेल्या 25 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आता शरद पवारांच्या साथीला केवळ जयंत पाटील हेच ताकदवान नेते आहेत. शरद पवार आणि जयंत पाटील हे दोन असे नेते आहेत. त्यांना पक्ष कोणताही असो, चिन्ह कोणताही असा काहीही फरक पडत नाही. गेल्या अनेक वर्षापासून सहकार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्रांतीचे ते जवळचे साक्षीदार आहेत. जयंत पाटील यांना संकटातही ही मोठी संधी चालून आली आणि त्यांनी संधीचे सोने केले. शरदचंद्र पवार गटाचे ते प्रदेशाध्यक्ष असले तरी पक्षाचे सर्वेसर्वा तेच आहेत. त्यांच्या निर्णयाला फार मोठी किंमत आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. जयंत पाटील यांनी 103 सभा घेवून दणका उडवून दिला. शरद पवार आणि जयंत पाटील यांना शुन्यातून विश्व निर्माण केले.

1999 मध्ये आमदार, खासदार तयार होते. राष्ट्रवादीमध्ये सर्व ताकदीचे नेते, वतनदार होते.

राज्यातील सहकार शरद पवारांच्या शब्दावर चालत होते. त्यामुळे राज्यातील बहुतांश कारखानदार शरद पवारांच्या पाठिशी राहिले. त्यावेळी विरोधी पक्ष एवढा ताकदवान नव्हता. केवळ काँगे्रसमध्येच गटतट होते. याचा फायदा, तोटा काँग्रेसलाच होत होता. परंतु काळ बदलत गेला. 2009 नंतर मोदी लाटेत देशात सर्वत्र भाजप पसरत गेला. अनेक राज्यात भाजपची सत्ता आली आणि भाजपची ताकद वाढली. शरद पवारांचेही वय वाढत गेले आणि अजित पवारांची ताकद वाढत गेली. अजित पवारांना मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा कधी लपून राहिली नाही. याचाच परिणाम म्हणून त्यांनी राष्ट्रवादी फोडली आणि पक्ष ताब्यात घेतला. अनेक मानब्बर नेते अजित पवारांच्या पाठिमागे गेले. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हही अजित पवारांना देवून टाकले.

शरद पवार आणि जयंत पाटील यांनी पक्ष पुन्हा जोमाने उभा केला.

येणार्‍या काळात विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे त्यांची पुन्हा एकदा कस लागणार आहे. तळागाळातून नवी मोठ बांधांवी लागणार आहे. परंतु हेे काही जयंत पाटील आणि शरद पवारांना नवीन नाही.

शरद पवारांनी या अगोरदही अनेक चिन्हावर आणि अनेक पक्षातून निवडणूक लढवून जिंकलेही आहेत.

जयंत पाटील आणि शरद पवार यांचा आजपर्यंत कोणीही पराभव करू शकला नाही. विकासकामे आणि सहकाराच्या माध्यमातून कार्यकर्ते त्यांना जोडले गेले आहेत. पक्ष आणि चिन्ह जरी त्यांच्या हातातून गेले तरी त्यांनी हार मानली नाही. दुसर्‍या दिवसापासून विजय निश्चय मेळाव्याच्या माध्यमातून ते जनतेसमोर येत आहेत. अशा अडचणीच्या प्रसंगातून त्यांनी अनेकवेळा मार्ग काढला आहे.

1984 मध्ये राजारामबापुंच्या अकाली निधनानंतर जयंत पाटील यांची राजकारणात एंन्ट्री झाली.

जयंत पाटील यांनी पाच वर्षे मतदार संघांचा अभ्यास केला आणि 1990 मध्ये पहिल्यांदा ते विधानसभेला उतरले. गेल्या सात निवडणुकीत प्रत्येकवेळी नवा उमेदवार त्यांच्या समोर उभा राहिला. प्रत्येकाला चितपट करीत ते पुढे चालले आहेत. यंदाही अजून विरोधकांमध्ये उमेदवार निश्चित नाही. विरोधकांमध्ये एकमत नाही. जयंत पाटील मात्र सर्व तयारीनिशी मैदानात उतरणार यात शंका नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज