rajkiyalive

SANGLI : निवडणुकीत बेरंग करणार्‍यांचा हिशोब चुकता करु ः खा. पाटील

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI : निवडणुकीत बेरंग करणार्‍यांचा हिशोब चुकता करु ः खा. पाटील : सांगली ः लोकसभा निवडणुकीत सापडतोय म्हटल्यावर माझ्यावर हत्यार काढण्याचा प्रयत्न झाला. काहींनी शब्द दिला पण पाळला नाही. पक्षातीलच काहींनी विरोधात काम केले. कोण कोणाला कोठे भेटले, कोणाशी चर्चा झाली, हे सर्व माहिती आहे. मात्र निवडणुकीत कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, वेळेला धावून आल्याचे उद्गार खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत काढले. या निवडणुकीत बेरंग करणार्‍या सर्वांचा व्याजासह हिशेब चुकता करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

SANGLI : निवडणुकीत बेरंग करणार्‍यांचा हिशोब चुकता करु ः खा. पाटील

खासदार पाटील म्हणाले, निवडणुकीत काहींनी शब्द दिला पण पाळला नाही. पक्षातीलच काहींनी विरोधात काम केले. ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले, त्यांच्याशी जशास तसे वागण्याची भूमिका घ्यावी लागेल. व्याजासह हिशेब चुकता केला जाईल. संजय पाटील यांच्यावर वार करणार्‍यांचा हिशेब चुकता होईल. इस्लामपूरहून तुम्हाला मदत झाल्याची चर्चा आहे, या प्रश्नावर संजय पाटील म्हणाले, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, वेळेला आला. दरम्यान संजय पाटील यांच्या उत्तराने दबक्या आवाजातील चर्चेला बळकटी मिळत असल्याचे स्पष्ट झाले.

माझं नशिब उलटंपालटं करणारा राजकीय पुढारी अजून पैदा व्हायचा आहे,

सांगलीत कोण निवडून येणार आहे, मी कोणत्या पाटलांच्या मागे उभा आहे, हे 4 जून रोजी कळेल असे वक्तव्य माजीमंत्री व आमदार असलेल्या एका राजकीय नेत्याने एका भाषणात केले आहे. पण माझं नशिब उलटंपालटं करणारा राजकीय पुढारी अजून पैदा व्हायचा आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून भाषण करणार्‍यांनी मतदानाच्या अगोदर गोपनीय बैठक घेऊन खिशातून ‘पाकिट’ काढून दाखवत मतदान कोणाला करायचे आहे, हे सांगितले.

हिंमत असेल तर त्यांनी जाहीरपणे सांगावे की त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे काम केले आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराशी विश्वासघात केला आहे. दरम्यान, मी त्यांच्या वेळेला उभा राहिलो आहे, पण यावेळी काय काय घडले ते सर्व कळाले आहे, असेही खासदार पाटील यांनी सांगितले.

काही जणांनी सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न केला.

मला घमेंड नाही. मस्तीही नाही. काही लोक हळवे असतात. काळजी करतात. त्यांनी अजिबात काळजी करू नये, मी तिसर्‍यादा खासदार होणार आहे. काही जणांनी सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा विशेष परिणाम होणार नाही. थोडे मताधिक्य कमी होईल. एक लाखापेक्षा जास्त मताने माझा विजय निश्चित आहे.
माजी जिल्हाध्यक्षांवर 4 जूननंतर बोलू

खासदार पाटील म्हणाले, विलासराव जगताप यांना बरेच दिवस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी हेकेखोरपणा सोडला नाही. अजितराव घोरपडे यांची भूमिका काय असणार हे माहिती होते, त्यामुळे त्यांनाही भेटलो नाही. जगताप, घोरपडे तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष यांनी काय केले. ते यापूर्वीच्या निवडणुकीतही काय करत होते, याबाबत 4 जूननंतर बोलू, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते.

टेंभू, ताकारी, म्हैसाळला पाणी कमी पडणार नाही

गतवर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. कोयना धरणातही पाणीसाठा कमी आहे. या पार्श्वभूमीवर विद्युत निर्मितीचे 12 टीएमसी पाणी सिंचन योजनांसाठी द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. 8 टीएमसी पाणी मंजुरीचे पत्रही आले आहे. गरज भासरल्यास आणखी 4 टीएमसी पाणी मिळेल. उन्हाळ्यात टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजनांना पाणी कमी पडू दिले जाणार नसल्याचे खा. संजयकाका पाटील यांनी सांगितले

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज