rajkiyalive

समडोळी हायस्कूलचा डंका जपान साकुरा विद्यापीठात

 

समडोळी हायस्कूलचा डंखा जपान साकुरा विद्यापीठात

 

समडोळी शिक्षण संस्था संचलित समडोळी हायस्कूल समडोळी येथील 10 वी च्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी कु. साधना संदिप भिलवडे हिने शालेय जीवनात वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून जपान टोकीया येथील साकुरा विद्यापीठ शैक्षणिक दौरा नुकताच पूर्ण केला. समडोळी सारख्या छोट्या ग्रामीण भागातून शिक्षण घेत नामांकीत शास्त्रज्ञांच्या संपर्कातून जपानचा शैक्षणिक दौरा पूर्ण करून तेथील टेक्नॉलॉजी, शिक्षण प्रणाली, अद्ययावत रोबोटिक्स, शेती प्रणाली आदी डिजीटल युगाची माहिती सात देशाच्या गुणवंत प्रज्ञावंत ज्ञानवंत विद्यार्थ्यांच्या सोबत घेवुन पूर्ण केेले.

 

हम, हमारे विद्यालय, हमारा देश भी कुछ कम नही है हे तिने भारताचे प्रतिनिधित्व सिद्ध करून नवीन विद्यार्थी पिढीसमोर एक अद्वितीय प्रतिनिधित्व सिध्द केले. तिच्या या प्रेरणेने ग्रामीण भागातील पुढील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दौर्‍यासाठी निश्चीतच प्रज्वलीत होतील यात शंका नाही .

तिचा माध्यमिक शालेय जीवनातील परदेशागमन तेही शासकीय व राष्ट्रीय स्तरावरून ही बाब सोपी नाही. ती नुकतीच जपान दौरा करून तिच्या जन्मभुमीत पाऊल ठेवताच ती जिथे सध्या शिक्षण घेत असलेल्या समडोळी शिक्षण संकुलात तिचा भव्य व दिव्य सत्कार संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, सचिव राजेंद्र कवठेकर . संचालक ए.जे.पाटील, डी. बी ढोले, स्कूल कमेटी चेअरमन बाळासो पाटील, अजित पाटील, आमगोंडा पाटील, शितल भोरे, डॉ.शितल बेले, एस.एन.पाटील मुख्याध्यापक नागेश तेली, सुवर्णा फराटे आदी उपस्थित होते.

पंडीत रुपेशकुमार उपाध्ये, संस्थेचा सर्व कर्मचारी वृंद आदी मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न करून पुढील उज्ज्वल भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज