sangli aagar news : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सांगली आगाराला मिळाल्या नव्या अत्याधुनिक बसेस : सांगली : अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या सांगली आगाराला अखेर नव्या बीएस सिक्स बसेस मिळाल्या आहेत. सांगली आगारात पाच बसेस शुक्रवारी सायंकाळी दाखल झाल्या. अत्याधुनिक आणि आकर्षक बसेस पाहण्यासाठी डेपो मध्ये गर्दी झाली होती. या बसेसचा आज आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान, सांगलीला 100 बसेसची गरज असताना केवळ पाच बसेस मिळाल्या आहेत. उर्वरित बसेस कधी मिळणार हा प्रश्न आहे.
sangli aagar news : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सांगली आगाराला मिळाल्या नव्या अत्याधुनिक बसेस
महामंडळच्या सांगली विभागातून विविध आगारात सुटणार्या बसेसची दुरावस्था झाली आहे. सांगली आगारात सध्या 95 बस कार्यरत असून त्यापैकी काही गाड्यांचा वापर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी केला जात आहे. सध्या सांगलीकडे जुनाट बीएस तीन आणि चार च्या बसेस धावत आहेत. विशेष म्हणजे यातील 40 हुन अधिक बसेसनी दहा लाखांहून अधिक किलोमीटरचे रनिंग झाले आहे. अशाच प्रकारे प्रवासादरम्यान लांब पल्ल्याच्या बस गाड्या वाटेत नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले असून अशा वेळी जवळच्या आगारात जाऊन बस दुरुस्त करून घेणे, नव्याने बस मागविणे अथवा प्रवाशांना इतर बस गाड्यांमध्ये बसून देण्याचे प्रकार घडत आहेत.
ती. याबाबत आमदार सुधीर गाडगीळ, आमदार जयंत पाटील यांनी देखील परिवहन मंत्र्यांना भेटून 100 नव्या बसेस देण्याची मागणी केली होती. बसेसच्या दुरावस्थेबाबत दैनिक जनप्रवास ने देखील आवाज उठवला होता. या सर्वांच्या प्रयत्नांना आता काही प्रमाणात यश येत आहे. शुक्रवारी सायंकाळी दापोडी कार्यशाळेतून अशोक लेलँड कंपनीच्या नव्या बीएस सिक्स या अत्याधुनिक बसेस सांगलीत दाखल झाल्या आहेत. आज शनिवारी आमदार गाडगीळ यांच्या हस्ते या बसेसचा शुभारंभ होणार आहे. मात्र, मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत आणखी 20 बसेस सांगलीला मिळतील अशी माहिती अधिकार्यांनी यावेळी बोलताना दिली.
sangli-aagar-news-after-a-long-wait-sangli-aagar-got-new-state-of-the-art-buses
कशी आहे नवीन लालपरी…
महामंडळाच्या स्व मालकीच्या या नव्या बसेस आहेत. अशोक लेलँड कंपनीकडून या तयार बसेस घेतल्या आहेत. या बस मध्ये प्रवाशांना बसण्यासाठी प्रशस्त सीट, एअर सस्पेंशन, पुषबॅक सीट्स, प्रत्येक सीटला चार्जिंग पोर्टची सुविधा आहे. लांब पल्ल्याचा प्रवास या बस मधून आरामदायी होण्यासाठी अनेक सोयी उपलब्ध केल्या आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



