कोल्हापूर जिल्ह्यातील सराईत तिघांना केली अटक : 7 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त.
sangli crime news : बनावट सोने तारण ठेऊन फायनान्स कंपनीला गंडा घालणारी टोळी जेरबंद : सांगली : शहरातील एका फायनान्स कंपनी मध्ये बनावट सोने तारण ठेऊन कंपनीची फसवणूक करणार्या कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांच्या मुसक्या सांगली शहर पोलिसांनी आवळल्या. यावेळी या तिघांकडून आलिशान कारसह 7 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मनी टू फायनान्स कंपनीचे मॅनेजर अमोल यादव यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश आप्पासाहेब पवार (वय 32), धनाजी रामचंद्र खुडे (वय 33) आणि अस्लम बापू देवर्षी (वय 22 सर्व रा. रुकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली.
sangli crime news : बनावट सोने तारण ठेऊन फायनान्स कंपनीला गंडा घालणारी टोळी जेरबंद
याबाबत अधिक माहिती अशी कि, संशयित तिघेजण सांगलीतील मनी टू मी या फायनान्स कंपनी मध्ये सोन्याच्या बांगड्या तारण ठेवण्यासाठी आले होते. यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी संदीप कुंभार आणि विशाल कोळी यांना माहिती मिळाली कि, वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय परिसरात असलेल्या फायनान्स कंपनीमध्ये संशयित तिघेजण बनावट सोन्याच्या बांगड्या या खरे असल्याच्या सांगून तारण ठेवत आहेत.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=oQbK13gYLmE[/embedyt]
मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्यांनी त्याठिकाणी त्याठिकाणी तातडीने जात संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचे सोने हे बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्याकडून दोन बनावट सोन्याच्या बांगड्या, कार आणि मोबाईल असा एकूण 7 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक महादेव पोवार, सागर होळकर, कर्मचारी रफिक मुलाणी, संदीप पाटील, सतीश लिंबळे, विशाल कोळी, गौतम कांबळे, संतोष गळवे, योगेश सटाले, संदीप कोळी, प्रशांत पुजारी, योगेश हाके यांच्या पथकाने केली.
sangli-crime-news-gang-arrested-for-defrauding-finance-company-by-pledging-fake-gold
अटकेतील दोघे सराईत गुन्हेगार…
या बनावट सोने प्रकरणी अटक करण्यात आलेले गणेश पवार आणि धनाजी खुडे हे दोघेजण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या दोघांनी कोल्हापूर जिल्ह्यात बनावट सोने तारण ठेऊन फसवणूक तसेच अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नागरिकांनी तसेच बँकेच्या अधिकार्यांनी अशा प्रकारे बनावट सोने तारण ठेवण्यासाठी आल्यास पोलीस ठाण्यास तात्काळ कळवावे. संशयित हे सराईत असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी व्यक्त केली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











