rajkiyalive

SANGLI BANK : जिल्हा बँकेचे 30 हजार शेतकरी कर्जमुक्त होणार

जनप्रवास । सांगली

SANGLI BANK : जिल्हा बँकेचे 30 हजार शेतकरी कर्जमुक्त होणार : सांगली ः जिल्हा बँकेने दोनशे कोटी नफयाचे उद्दिष्ट पार केले असून शेतकर्‍यांची जुनी थकबाकी वसुलीसाठी मोहिम हाती घेतली आहे. शेतकर्‍यांच्या थकित पीक कर्जाच्या वसुलीसाठी एकरकमी कर्जवसुली योजना (ओटीएस) सुरु केली आहे. जुनअखेरची पीक कर्जाची सुमारे 743 कोटी थकबाकी आहे. जिल्ह्यात सुमारे 30 हजार थकबाकीदार शेतकरी असून त्यांना 30 जून अखेर ओटीएस योजनेचा लाभ घेता येणार आहे. यानिमित्ताने वर्षानुवर्षे थकित असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाल्याचे स्पष्ट झाले.

SANGLI BANK : जिल्हा बँकेचे 30 हजार शेतकरी कर्जमुक्त होणार

743 कोटीच्या वसुलीसाठी ओटीएस योजना, 30 जूनपर्यंत लाभ घेता येणार

जिल्हा बॅँकेची शेती व बिगर शेती कर्जाची थकबाकी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे बॅकेचा एनपीए 14 टक्क्यांवर गेला होता. मात्र गेल्या दोन वर्षात बॅँकेने थकबाकी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवत बिरगशेतीसह शेती कर्जाला एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजना सुरु केली. बॅँकेचा एनपीए कमी करण्यासाठी अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात बॅँकेचा एनपीए पाच टक्क्याच्या आत आणण्याचा निर्धार करण्यात आला असून त्यादष्टीने प्रशासन काम करीत आहे.

SANGLI BANK : जिल्हा बँकेचे 30 हजार शेतकरी कर्जमुक्त होणार : शेती कर्जाच्या वसुलीवर बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी मागील वर्षभरापासून विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी ओटीएस योजनेचा लाभ घेत थकबाकी भरावी. यासाठी वाघ यांनी जिल्हा बॅँकेतील अधिकार्‍यांना तालुक्यात पाठवून शेतकर्‍यांच्या बांधावर जाण्यास भाग पाडले होते. शेती कर्जाची सर्वाधिक थकबाकी असलेल्या जत तालुक्यातील वसुलीसाठी जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांना कामाला लावले. गतवर्षी याचे चांगले परिणाम दिसून आले होते. त्यामुळे पुन्हा ओटीएस योजना लागू केली.

जिल्हा बँकेने वाटप केलेल्या पीक कर्जापैकी जुनी आणि चालू मिळून सुमारे 2237 कोटी इतकी थकबाकी होती. पैकी 1494 कोटी इतकी मार्च अखेर वसुली केली. आता जुन अखेरीच्या वसुलीचे नियोजन बँकेने केले आहे. जुनअखेर सुमारे 743 कोटी वसुली शिल्लक आहे. या वसुलीसाठी बँकेने 150 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. थकबाकी न भरणार्‍यांवर बँकेकडून कडक कारवाई केली जाणार आहे.

पीक कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने तालुकानिहाय आणि शाखानिहाय कर्मचार्‍यांना वसुलीचे टार्गेट दिले होते. यामध्ये सर्वाधिक वसुली कडेगाव तालुक्यातून 99.90 इतकी झाली आहे. त्याखालोखाल वाळव्यातून 86.86 टक्के झाली आहे. तर सर्वात कमी दुष्काळी जत तालुक्यातून 47 टक्के इतकी झाली आहे. वसुलीमध्ये पलूस 73, शिराळा 78, आटपाडी 77, खानापूर 74, तासगाव 59 कवठेमहकांळ 58.76, मिरज 66 टक्के इतकी वसुली झाली आहे. उर्वरित वसुलीला ओटीएसचा आधार मिळण्याच्या आशा आहेत.

नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत शेतातून उत्पन्न मिळत नसल्याने या जत तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी होत आहे, दुष्काळामुळे अडचणीत असूनही शेतकर्‍यांनी कर्जाची रक्कम भरली आहे. तालुक्याची 147 कोटी तब्बल 95 कोटी इतकी रक्कम वसुल झाली असून अद्याप 52 कोटी वसुल होणे बाकी आहे. पीक कर्जाच्या ओटीएस योजनेमुळे जिल्ह्यातील थकबाकीदार असलेल्या सुमारे 30 हजार शेतकर्‍यांना कर्जमुक्त होण्याची संधी मिळणार आहे.

शेतकर्‍यांना व्याजमाफी मिळणार ः आ. मानसिंगराव नाईक

जिल्हा बॅँकेने यापूर्वी शेतकर्‍यांना दिलेल्या ओटीएस योजनेमुळे थकबाकी वसुलीत वाढ झाली आहे. त्या धर्तीवर पुन्हा थकित कर्जाच्या वसुलीसाठी ओटीएस योजना सुरु केली आहे. ओटीएस अंतर्गत व्याज माफी शेतकर्‍यांना देण्यात येईल. या व्याज माफीची तरतूद बॅँकेच्या नफ्यातून करण्यात येणार आहे. मार्च 25 अखेर बॅँकेचा नेट एनपीए 5 टक्क्याच्या आत आणण्याचा प्रयत्न असल्याचे बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज