rajkiyalive

sangli bank news : जिल्ह्यात एक हजार कोटी शेती कर्ज थकित

sangli bank news : जिल्ह्यात एक हजार कोटी शेती कर्ज थकित : सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत शेती कर्जाची तब्बल 1 हजार 48 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुमारे 700 कोटी रुपयांचा समावेश आहे. पाच महिन्यांपूर्वी झालेली विधानसभा निवडणूक शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर चांगलीच गाजली. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यास तीन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले, तर तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची ग्वाही निवडणुकीत दिली. मात्र पुन्हा आलेल्या महायुती सरकारने अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत कोणतीही तरतूद न केल्याने अपेक्षा फोल ठरली.

sangli bank news : जिल्ह्यात एक हजार कोटी शेती कर्ज थकित

जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 700 कोटीची थकबाकी, सरसकट कर्जमाफीची अपेक्षा फोल

मागील वर्षी झालेली विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली होती. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीच्या पक्षांकडून निवडणुकीत राजकीय पक्षांकडून शेतकर्‍यांना कर्जमाफी देवू अशी आश्वासने देण्यात आली होती. त्यामुळे सत्तेत कुणीही येवो कर्जमाफी होणार हे स्पष्ट होते. आता महायुती सत्तेत आली असून शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीवर सकारात्मक भाष्य केल्याने शेतकर्‍यांना आता कर्जमाफीची आशा लागून चुकली असल्याचे दिसून येत आहे.

सरसकट कर्जमाफी शेतकर्‍यांना शासनाने द्यावी अशी मागणी करण्यात आली.

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीने कहर केल्यामुळे उत्पादनात घट निर्माण झाली असतांनाच कोणत्याच पिकाला अपेक्षित दर बाजारपेठेत उपलब्ध नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे यावर्षी तरी अटी, शर्थी व निकषावर बोट न ठेवता सरसकट कर्जमाफी शेतकर्‍यांना शासनाने द्यावी अशी मागणी करण्यात आली. राज्यात 1 कोटी 31 लाख शेतकरी असून या शेतकर्‍यापैकी 15 लाख 46 हजार 379 शेतकर्‍यांच्या डोक्यावरील बँकांचे कर्ज थकलेले आहे. त्या शेतकर्‍यांचे विविध बँकांचे 30 हजार 495 कोटीचे कर्ज थकीत आहे.

सांगली जिल्ह्यातील एक लाख 9 हजार 502 शेतकर्‍यांचे एक हजार 48 कोटी रुपयांचे विविध बँकांचे कर्ज थकीत

सांगली जिल्ह्यातील एक लाख 9 हजार 502 शेतकर्‍यांचे एक हजार 48 कोटी रुपयांचे विविध बँकांचे कर्ज थकीत असल्याचे बँकर्स कमिटीकडील आकडेवारीवरुन समोर आले आहे. सहकारी बँकींग क्षेत्रात जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तब्बल 650 कोटी रुपयांची थकबाकी शेती कर्जाची थकबाकी आहे. राष्ट्रीयीकृत आणि नागरी बँका बँकामधील सुमारे 248 कोटी रुपयांचे शेतीकर्ज थकित असल्याचे स्पष्ट झाले. सरकारकडून कर्जमाफी मिळणार असल्याची आस लागल्याने शेतकर्‍यांनी शेती कर्ज भरलेच नाही.

sangli-bank-news-one-thousand-crore-agricultural-loans-outstanding-in-the-district

राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांच्या कर्जमाफी संदर्भात काही निर्णय होईल, असे अनेकांना वाटत होते. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जाची रक्कम भरण्यासाठी थांबले होते. मात्र शेतकर्‍यांची कर्जमाफी होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्या कर्जाची रक्कम भरलेली आहे. कर्जमाफी मिळणार नसल्याने उर्वरित शेतकर्‍यांनीही वेळेवर कर्जाची रक्कम भरावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. पीक कर्ज 31 मार्चपर्यंत भरल्यास पीक कर्जाला शून्य टक्के व्याजाचा लाभ होईल. त्याशिवाय दंड भरावे लागणार नसल्याचे दिसून येते.

संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ करायचे झाल्यास 30 हजार कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाला त्यासाठी खर्च करावा लागणार आहेत. सद्या बँकाकडून थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्ज भरण्यासाठी तगादा लावला जात आहे, कारवाईच्या नोटीस सुद्धा पाठविल्या जात आहेत. खाजगी सावकारांचे कर्ज पण अनेक शेतकर्‍यांच्या डोक्यावर असल्याने काही शेतकरी आत्महत्येकडे वळत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे व्यावसायिक, उद्योगपती यांचे कर्ज माफ करण्याऐवजी आता शेतकर्‍यांनाही सरसकट कर्जमुक्त करून त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सात वर्षे तांत्रिक अडचणींमुळे कर्जमाफीपासून वंचित

संपूर्ण कर्जमाफी करु म्हणणार्‍या महायुती सरकारला कर्जमाफीचा सपशेल विसर पडला आहे. गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे कर्ज केवळ शासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे माफ होवू शकले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ’आम्ही सत्तेत आल्यावर शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करु’ असे आश्वासन महायुतीने दिले होते. आता सत्ता आल्याने ’मायबाप सरकार, काहीही करा पण आमचा सातबारा कोरा करा’ अशी आर्त हाक शेतकरी करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज