rajkiyalive

sangli bjp news : जिल्ह्यात भाजप 2 लाख सदस्य नोंदणी करणार

आ. गोपीचंद पडळकर ः भाजप पदाधिकार्‍यांची बैठकीत संपन्न

sangli bjp news : जिल्ह्यात भाजप 2 लाख सदस्य नोंदणी करणार : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 12 जानेवारीपर्यंत कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी सदस्यता नोंदणी करावी, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

sangli bjp news : जिल्ह्यात भाजप 2 लाख सदस्य नोंदणी करणार

येथील खरे मंगल कार्यालयात सदस्यता नोंदणी अभियानासाठी सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नवनिर्वाचित आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ व गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करण्यात आला. सलग वीस वर्ष भाजपचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम केल्याबद्दल केदार खाडिलकर यांचा सत्कार आमदार पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

आमदार पडळकर म्हणाले, भाजपच्यावतीने संपूर्ण देशभर सदस्यता नोंदणीचा कार्यक्रम सध्या चालू आहे. जिल्हयाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. सर्व पदाधिकार्‍यांनी सक्रिय सदस्य होऊन येत्या 12 जानेवारीपर्यंत मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. सांगली शहर जिल्ह्यातून दोन लाख सदस्य करण्याचे उद्दिष्ट यावेळी ठरवण्यात आले.

जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी अभियानाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सोशल मीडिया संयोजक संकेत कुलकर्णी यांनी सदस्यता नोंदणी संदर्भात, मोबाईलवरून कशा पद्धतीने सदस्य नोंदणी करायची त्याबद्दल माहिती दिली. सरचिटणीस मोहन वाटवे यांनी सूत्रसंचालन केले.
आमदार सुरेश खाडे आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. येणार्‍या महापालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे सदस्यता अभियान अत्यंत महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सदस्यता अभियान पूर्ण ताकतीने राबवण्याबद्दल विश्वास व्यक्त केला.

यावेळी श्रीकांत शिंदे, स्वाती शिंदे, संगीता खोत, भारती दिगडे, अविनाश मोहिते, प्रदीप कांबळे, डॉ. भालचंद्र साठे, सोनाली सगरे, कल्पना कोळेकर राजू कुंभार, माधुरी वसगडेकर, संजय यमगर यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी मंडल अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज