rajkiyalive

sangli bjp news : दलित महासंघाचा सुधीर गाडगीळ यांना पाठींबा

महायुतीचा प्रचार करणार ः मच्छिंद्र सकटे

sangli bjp news : दलित महासंघाचा सुधीर गाडगीळ यांना पाठींबा: सांगलीत भाजपचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह जिल्ह्यातील आणि राज्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना दलित महासंघाने पाठिंबा जाहीर करीत असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

sangli bjp news : दलित महासंघाचा सुधीर गाडगीळ यांना पाठींबा

प्रा. सकटे म्हणाले, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार यांनी दलित समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आम्ही महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर देत आहे. दलित महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुधीर गाडगीळ यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील.

भाजप सरकारने 26 नोव्हेंबर हा संविधानदिन म्हणून जाहीर केला असून तो साजरा करण्यासही सुरुवात केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी करून तेथे शिक्षाभूमी स्मारक उभे करण्यात आले आहे. वाटेगाव या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारण्यास महायुती सरकारने 25 कोटी रुपये निधी दिला आहे.

अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट(आर्टी, मुंबई )या संस्थेची महायुती सरकारने स्थापना केली आहे. अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षण उपवर्गीकरणास गती देण्याच्या दृष्टीने निवृत्त न्यायाधीश बदर यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारने अभ्यास समिती नियुक्त केली आहे. जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवल्यामुळे त्या राज्यात भारतीय संविधानाची आता अंमलबजावणी सुरू झाली आहे. यावेळी सतिश मोहिते, माजी आमदार दिनकर पाटील, केदार खाडिलकर उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज