sangli bjp news : भाजपचे मुळनिवासी केवळ पालखीवाहू आयारामांना मिळाली लाभाची पदे…: जिल्ह्यात बारा वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम फळी होती. मात्र अलीकडच्या काळात दोन्ही पक्षाला गळती लागली अनेकजण सत्तेचे लाभार्थी होण्यासाठी भाजपमध्ये पळाले. लाभाची खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौरपदासह अनेक महत्वाची पदे मिळवली. पण भाजपचे अनेक वर्षांपासूनचे असलेले मुळनिवासी मात्र केवळ पालखीवाहू राहिले आहेत. अडचणीच्या काळात पक्षाचा झेंडा खांद्यावर ठेवणार्यांना केवळ पक्षवाढीची जबाबदारी मिळाली. त्यामुळे मुळचे भाजपवासी नाराज आहेत.
sangli bjp news : भाजपचे मुळनिवासी केवळ पालखीवाहू आयारामांना मिळाली लाभाची पदे…
सांगली जिल्हा तसा माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटलांचा. त्यामुळे जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र 1999 साली काँगेे्रसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र झाला. अनेकजणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. कालांतराने या दोन्ही पक्षांमध्ये लोकसभा, विधानसभा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाड्या होऊ लागल्या, अनेक वर्षे सत्ता भोगली. पण 2014 ला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी भुईसपाट झाली.
मग केंद्राबरोबर राज्यात सत्तांतराची वेळ आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी सत्तेबरोबर जाण्याचा मार्ग स्वीकारला आणि थेट संस्कार न जुळणार्या भाजपमध्ये उडी मारली. त्यामुळे या राजकीय नेत्यांनी स्वत:चा राजकीय फायदा करून घेतला पण भाजपमधील मुळनिवासी लोकांना यामध्ये तोटा सहन करावा लागत आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जिल्ह्यात चार जागा मिळवला.
त्यापैकी शिराळ्याचे आ. सत्यजीत देशमुख व आ. गोपीचंद पडळकर हे मुळचे भाजपचे नाहीत. शिराळ्याचे आ. सत्यजीत देशमुख हे स्व. शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र. देशमुख कुटुंबिय हे काँग्रेसचे निष्ठावंत होते. मात्र सत्यजीत देशमुख यांनी विधानपरिषदेच्या अपेक्षेवर भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र संधी मिळाली नाही. त्यामुळे 2024 ला विधानसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. तर दुसरीकडे जतचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील मुळचे राष्ट्रीय समाज पक्षाचे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दला या पक्षातून सुरूवात केली. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारी घेतली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत विधानपरिषद मिळवली. आता 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्ष सध्या तरूण तडफदार सम्राट महाडिक झाले आहेत.
पण सम्राट महाडिक हे मुळचे काँग्रेसचे आहेत. स्व. नानासाहेब महाडिक यांचे ते चिरंजीव. त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना पक्षाने जिल्हाध्यक्ष या महत्वाच्या पदाची जबाबदारी दिली आहे. तर दुसरीकडे 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये भाजपमधील प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारीची संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणार्या माजी खा. संजयकाका पाटील यांना पक्षाने संधी दिली. या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होऊन काका निवडून आले. पण दरवेळी भाजपच्या चिन्हावर काँग्रेस आघाडीला टक्कर देणार्या उमेदवारांच्या पदरी निराशा आली. 2019 ला देखील पुन्हा तेच घडले. काका पूर्वी काँग्रेसचे होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेची संधी दिल्याने ते राष्ट्रवादीत गेले होते. ते सध्या राष्ट्रवादीत आहेत.
तर 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपकडून माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना शिराळ्यातून तर जतमधून विलासराव देशमुखांना संधी मिळाली. ते दोघे आमदार झाले. पण ते मुळचे भाजपचे नव्हते. माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे मुळचे काँग्रेसचे. 1995 ला त्यांनी बंड करत विधानसभा जिंकली. पुन्हा राष्ट्रवादी व आणि काँग्रेस असा प्रवास करत 2014 ला भाजप प्रवेश केला आणि आमदार झाले. मात्र 2019 ला पराभव झाला ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत.
sangli-bjp-news-only-bjps-natives-palkhiwahu-ayaram-got-posts-of-profit
माजी आमदार विलासराव जगताप हे राष्ट्रवादीचे. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद पक्षाच्या माध्यमातून मिळाले.
त्यानंतर 2014 ला भाजपमध्ये प्रवेश करून आमदारकी जिंकली. मात्र 2024 ला भाजपविरोधात भूमीका घेतली सध्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर कडेपूरचे माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांना विधानपरिषद तर संग्रामसिंह देशमुख यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे देखील भाजपमुळे मिळाले. ते देशमुख बंधू दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होते. सध्या ते भाजपमध्ये आहेत.
सांगली महापालिकेच्या माजी महापौर संगीता खोत या मुळच्या जनता दल पक्षाच्या.
स्व. प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी महापालिकेत एन्ट्री केली. मात्र त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2018 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या महापौर बनल्या. त्यानंतर गीता सुतार यांना महापौरपदाची संधी मिळाली. त्यांचे पती सुयोग सुतार हे मुळचे शिवसैनिक. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून 2018 च्या निवडणुकीत गीता सुतार यांना नगरसेवकपदाची उमेदवारी घेतली. त्या निवडून आल्या आणि सव्वा वर्षे सत्तेच्या काळात त्या महापौर झाल्या.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.