rajkiyalive

sangli bjp news : डोंगरेंची बंडखोरी: शेखर इनामदार भूमीगत, आ. गाडगीळांच्या उमेदवारीने भाजपमध्ये भूकंप: 

जनप्रवास । सांगली

sangli bjp news : डोंगरेंची बंडखोरी: शेखर इनामदार भूमीगत, आ. गाडगीळांच्या उमेदवारीने भाजपमध्ये भूकंप:  सांगली विधानसभेची निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा करणारे भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांना पक्षाने पुन्हा तिसर्‍यांदा उमेदवारी जाहीर केल्याने भाजपमध्ये भूकंप झाला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार नाराज झाले असून भूमीगत झाले आहेत.

sangli bjp news : डोंगरेंची बंडखोरी: शेखर इनामदार भूमीगत, आ. गाडगीळांच्या उमेदवारीने भाजपमध्ये भूकंप: 

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे एका निवेदनाव्दारे जाहीर केले होते. त्यांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला होता. निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. आ. गाडगीळ यांनी यावर फेरविचार करू, असे देखील स्पष्ट केले होते. या काळात भाजपकडून युवा नेते पृथ्वीराज पवार, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, स्वाती शिंदे आदी इच्छुकांनी विधानसभा मतदारसंघात पेरणी सुरू करत उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते.

रविवारी भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये पुन्हा आ. सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी पसरली. शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी सोमवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे प्रामाणिकपणे काम करत असून प्रत्येक विधानसभेला डावलून पुढच्यावेळी संधी देतो, असे सांगितले जात आहे. यावेळी देखील हाच प्रकार झाला. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी करणार असल्याचे शिवाजी डोंगरे यांनी जाहीर केले.

तर दुसरीकडे शेखर इनामदार देखील पक्षावर नाराज झाले आहेत. आ. गाडगीळ यांची इच्छा नसल्याने पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांनी तशी तयारी देखील केली होती. मात्र इच्छा नसलेल्या व्यक्तिंना उमेदवारी दिल्याने ते नाराज झाले आहेत. आ. सुधीर गाडगीळ यांनी शेखर इनामदार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र इनामदार यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली. जर पक्षाला माझी गरज नसेल तर मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. इनामदार सोमवारी दूरध्वनी बंद करून भूमीगत झाले आहेत. ते शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज