sangli congress news : काँग्रेसचे पाच माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात : महापालिका क्षेत्र व मिरज तालुक्यातील अनेक माजी पदाधिकार्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला होता. आता काँग्रेसचे पाच माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) पक्षाच्या संपर्कात आहेत.
sangli congress news : काँग्रेसचे पाच माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात
त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सांगलीत येणार आहेत. त्यावेळी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी केल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले होते. त्यामुळे त्यांनी गेल्या महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याबरोबर अनेक माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंच यासह पदाधिकार्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. काँग्रेसचे काही माजी नगरसेवक व पदाधिकारी अद्याप काँग्रेसमध्ये आहेत. पण दिशाहीन झालेल्या काँग्रेसच्या नेतृत्वामुळे काँग्रेसचे सांगली व मिरजेतील पाच माजी नगरसेवक सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहेत.
जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र काँग्रेसच्या अनेक मुस्लिम व मागासवर्गीय प्रभाग असलेल्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. हे नगरसेवक सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या संपर्कात आहेत. त्यांच्या प्राथमिक बोलण्या देखील सुरू झाल्या आहेत. सांगली व मिरजेतील हे नगरसेवक असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
sangli-congress-news-five-former-congress-corporators-in-contact-with-ncp
पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हा दौर्यावर येणार आहेत. जत व सांगलीत पक्षाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला हा दुसरा मोठा धक्का असणार आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.