rajkiyalive

sangli congress news : पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची धमक : आ. बाळासाहेब थोरात

sangli congress news : पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची धमक : आ. बाळासाहेब थोरात : महायुती शासन हे कायम महापुरुषांचा अपमान करते. त्यांच्या राज्यात महिलांचा अपमान होतो. भ्रष्टाचारी महायुती शासनाला जनता घरी बसवणार आणि महाआघाडीचे सरकार येणार आहे. पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची दूरदृष्टी आहे. पाच वर्षे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांना आमदार म्हणून निवडून द्या, असे आवाहन काँग्रेसचे जेष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.

sangli congress news : पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची धमक : आ. बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ कर्नाळ (ता. मिरज) येथे जाहीर सभा झाला. या सभेत आ. बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी सरपंच संध्या कांबळे, उपसरपंच नसीम चौगुले, युवराज पाटील, नासीर चौगुले, राष्ट्रवादीचे राजू पाटील, गणेश घोरपडे, रघुनाथ घोरपडे, महावीर पाटील आदी उपस्थित होते.

आ. बाळासाहेब थोरात म्हणाले, पृथ्वीराज पाटील यांच्या पाच वर्षाच्या कामाचा अहवाल पाहूनच त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीच्या समस्या काय आहेत आणि त्या सोडवण्यासाठी काय केले पाहिजे. भविष्यात सांगली कशी असावी? याबाबत त्यांनी वैयक्तिक जाहीरनामा तयार केला आहे त्याप्रमाणे ते निश्चितच सांगलीचा विकास करु शकतात. महायुती शासन हे धर्मांध आहे. जाती-पातीत भांडणे लावून फूट पाडणार्‍या या अकार्यक्षम सरकारला गाडण्याची हीच वेळ आहे. राज्यातील जनता या सरकारला कंटाळली आहे. वीस नोव्हेंबरला हात चिन्हासमोरील बटण दाबून पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन केले.

पृथ्वीराज पाटील म्हणाले, कर्नाळसाठी रिंगरोडला सव्वा कोटी आणि अंबरसो दर्ग्यासाठी सात लाखाचा निधी महाआघाडी सरकार असताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला. नगरविकास खात्याकडून दहा कोटीचा निधी आणून अनेक कामे करता आली. कोरोना आणि महापूर काळात मी केलेली मदत सांगलीकर विसरणार नाहीत. मी प्रामाणिकपणे पडत्या काळात सांगलीत काँग्रेस जिवंत ठेवली.

श्रीराम मंदीर प्रतिकृती आणि नवरात्रोत्सव हे उपक्रम राबवले. खोतवाडीचा पूल उभा केला. सिव्हिलसाठी 500 बेडचे हॉस्पिटल निधीसह मंजूर करून घेतला. मला पाच वर्षे आमदार म्हणून संधी द्या. आमदार कसा असावा हे सिध्द करुन दाखवेन.

स्वागत व प्रास्ताविक विक्रम कदम यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आदिती कदम व सुनिता नरळे, प्रा. नझीर चौगुले, कुणाल माने, वैभव बंडगर आदी उपस्थित होते. आभार नासीर चौगुले यांनी मानले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज